
डॉ. ऋतुपर्ण शिंदे - हृदयरोगतज्ज्ञ
लठ्ठपणा आणि जीवनशैली विकारांमुळे आज यकृताचे (लिव्हर) आजार झपाट्याने वाढत आहेत. यातील सर्वांत सामान्य आणि ‘शांतपणे वाढणारा’ विकार म्हणजे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज - एनएएफएलडी. हा आजार त्या लोकांमध्ये आढळतो, जे दारू पित नाहीत पण शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असल्यामुळे यकृतात चरबी साठते. एनएएफएलडीला ‘लाइफस्टाइल-रिलेटेड लिव्हर डिसॉर्डर’ म्हणणे अधिक योग्य ठरेल.