
महेंद्र गोखले
फिटनेस नेहमीच पूर्णपणे शारीरिक प्रक्रिया समजली जाते. तथापि, फिटनेसची मानसिकता हा पैलू फिटनेसच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. आपली मानसिकता ही फिटनेसचे उद्दिष्ट साध्य करण्यामागील प्रेरणा असू शकते किंवा त्यामधला अडथळा बनू शकते. आज आपण फिटनेस साध्य करण्याच्या मानसिक पैलूचे महत्त्व आणि फिटनेसचे ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक ती मानसिकता याबद्दल माहिती घेऊ.