Video : दिवाळीत Binge eating केलयं, आता करा 'हा' योगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Binge eating

"सणाच्या दिवसात आपण स्वादिष्ट पदार्थांचा मोठ्या प्रमाणात आस्वाद घेत असतो. त्यानंतर पुन्हा पथ्य पाळणे अधिक कठीण होते," असे जुही कपूर म्हणाल्या.

Video : दिवाळीत Binge eating केलयं, आता करा 'हा' योगा

आपल्याला अनेकदा असे पदार्थ खाण्याचा मोह होतो, जे खाणे आपण टाळत असतो. सण-उत्सवांच्या हंगामात तर आपला ताबा हमखास सुटतो आणि आपण मिठाई तसेच तळलेल्या स्वादिष्ट पदार्थांवर तुटून पडतो. हे लक्षात घ्यायला हवं की, वारंवार मोठ्या प्रमाणात अन्न सेवन केल्याने वजन वाढणे, हृदयविकार, टाइप 2 मधुमेह आणि अगदी गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (GERD) सारख्या अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आहार आणि व्यायाम इत्यादी गोष्टींचं योग्य संतुलन राखणं आवश्यक आहे.

हेही वाचा: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताय? अशावेळी करु नका ही चूक...

आहारावरील नियंत्रण हाच अति आहारावर मात करण्याचा एक अत्यावश्यक भाग असल्याचं सांगताना योगा ट्रेनर जुही कपूर इतर तीन टिप्स सुचवत आहेत. "सणाच्या दिवसात आपण स्वादिष्ट पदार्थांचा मोठ्या प्रमाणात आस्वाद घेत असतो. त्यानंतर पुन्हा पथ्य पाळणे अधिक कठीण होते," असं जुही कपूर यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये नमूद केले आहे.

त्यांच्या मते, विशेषत: जेव्हा तुम्हाला जास्त प्रमाणात खावेसं वाटते, तेव्हा दररोज १० मिनिटे ज्ञान मुद्रा करावी. त्यानं अन्नाचे व्यसन नियंत्रित करण्यासाठी मदत होईल.

ज्ञान मुद्रा कशी करावी?

- आरामदायी आसनस्थ स्थितीत बसा आणि तळहात मांड्या किंवा गुडघ्यांवर वरच्या दिशेने ठेवा.

- डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या.

- तुमच्या दोन्ही हातांची तर्जनी दुमडून हातांच्या अंगठ्याच्या टोकाला तर्जनीचे टोक लावा.

- इतर तीन बोटे शक्य तितकी सरळ करावीत.

- रोज १० मिनिटे किंवा जेव्हाही तुम्हाला जास्त खावंस वाटेल, तेव्हा ही क्रीया करा.

हेही वाचा: का खरंच जेवण झाल्यावर फेरफटका मारल्याने अन्न सहज पचते?

हळूहळू खा-

मन लावून अन्न खा आणि प्रत्येक घासाच्या दरम्यान थोडा वेळ घ्या.

पाणी-

भरपूर पाणी प्या आणि दिवसभर हायड्रेटेड रहा.

loading image
go to top