esakal | हाडांना बनवा स्ट्राँग! आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

Food

हाडांना बनवा स्ट्राँग! आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

sakal_logo
By
शर्वरी जोशी

आपल्या शरीराची योग्य पद्धतीने हालचाल होण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव अत्यंत महत्त्वाचं कार्य बजावत असतो. यामध्येच अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा भाग म्हणजे शरीरातील हाडे. मानवाच्या शरीराला आकार व आधार देण्याचं महत्त्वाचं कार्य हाडे करत असतात. मानवी शरीरात २०६ हाडे असून ते कनेक्टिव्ह टिशू म्हणून ओळखले जातात. आयुर्वेदामध्ये हाडांना अस्थिधातू असं म्हटलं जातं. गेल्या काही काळात धावपळ, दगदग, चुकीची आहारपद्धती या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत आहे. परिणामी, हाडे ठिसूळ होणे किंवा कमकुवत होणे यांचं प्रमाण वाढलं आहे. म्हणूनच, शरीरातील बोन्स म्हणजेच हाडे स्ट्राँग होण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते पाहुयात. (food-helps-for-strong-immunity-healthy-heart-strong-bones-ssj93)

१. कॅल्शिअम -

आपल्या शरीराला दररोज १ हजार ते १२०० मिलीग्रॅम कॅल्शिअमची गरज असते. ही गरज आपण दूध, दुग्धजन्य पदार्थ (लोणी, तूप), नाचणी, विविध प्रकारच्या डाळी तसेच कठीण कवचाची फळे (अक्रोड, बदाम, पिस्ता, जर्दाळू) यांच्या माध्यमातून भरून काढू शकतो. तसंच आहारात तीळ, मेथीचे दाणे, भोपळ्याच्या बिया, हिरव्या पालेभाज्या यांचाही आवर्जुन समावेश केला पाहिजे. त्यामुळे शऱीरातील कॅल्शिअमची कमतरता भरुन निघेल व हाडे मजबूत होतील.

२. व्हिटॅमिन डी -

आहारातील अतिरिक्त कॅल्शिअम शोषून घेण्यासाठी याचा उपयोग होता. यासाठी दररोज सकाळी १५ मिनीटे कोवळ्या उन्हात बसावे. तसंच आहारात अंडी, मांसाहार याचा समावेश करावा.

३.व्यायाम -

नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे स्नायू आकुंचित पावणे, हाडांमधून आवाज येणे या समस्या दूर होतात. तसंच दैनंदिन व्यायामामध्ये त्रिकोणासन , सेतुबंधासन , भुजंगासन, वीरभद्रासन, विपरीत करणी मुद्रा या योगासनांचा समावेश करावा.

४. पंचकर्म व आयुर्वेदिक औषधे -

पंचकर्मातील काही औषधे वापरून बनविलेल्या दुधातुपाच्या बस्तीचा हाडांना बळ देण्यासाठी वापर केला जातो. तसेच आयुर्वेदामध्ये कॅल्शिअम असलेले द्रव्य वापरून बनविलेल्या औषधांचाही आपण वापर करू शकतो. जसे कि अस्थिपोषक वटी, लाक्षादी गुग्गुळ.

( लेखिका डॉ.पूजा भिंगार्डे या वेदिक्यूर हेल्थकेअर एण्ड वेलनेस येथे आयुर्वेदाचार्य आहेत.)

loading image