esakal | वारंवार लघुशंका येत असल्यास ती आहेत गंभीर आजाराची लक्षणे

बोलून बातमी शोधा

Frequent urination will cause these diseases}

वारंवार लघुशंकेला जावे लागते. वृद्धांमध्ये ही समस्या जाणवते. तरूणांमध्येही याचे प्रमाण वाढते आहे. साधी वाटणारी ही समस्या गंभीर स्वरूपही धारण करू शकते.

वारंवार लघुशंका येत असल्यास ती आहेत गंभीर आजाराची लक्षणे
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर ः बदलेली लाईफस्टाईल अनेक आजारांना निमंत्रण देत असते. साधे वाटणारे आजार माणसाला मानसिकदृष्ट्या खचवून टाकतात. वारंवार लघुशंका ही दीर्घ समस्य असते.

प्रोस्टेट (prostate) नावाची ग्रंथी फक्त पुरुषांच्या शरीरात आढळते. प्रोस्टेट ही सुपारीच्या आकाराची ग्रंथी 
मूत्रनलिकेच्या (urethra) सुरवातीस वेढलेली असते. प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वयोमानाप्रमाणे वाढत जातो आणि 
त्यामुळे मूत्रनलिकेवर दाब येऊन लघवी करण्यास त्रास होतो. भारत आणि सर्व जगामध्येच आयुर्मान वाढल्यामुळे 
बी.पी.एच.चा त्रास असलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. 

वयाबरोबर होणारी प्रोस्टेटची कॅन्सरविरहित व संक्रमणविरहित असलेली वाढ म्हणजेच बी.पी.एच. -बिनाईन 
प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी/हायपरप्लासिया (BPH) 
बी.पी.एच.ची लक्षणे : 

  • - वारंवार लघवी लागणे. विशेषतः रात्रीच्या वेळी. 
  • - लघवीची धार बारीक / थांबून थांबून होणे. 
  • - लघवीला सुरवात होण्यास वेळ लागणे. 
  • - लघवी होऊनही शिल्लक राहिल्यासारखे वाटणे. 
  • - लघवी बंद होणे व नळी टाकावी लागणे. 
  • - लघवी करताना आग होणे/दुखणे (जंतू संसर्ग). 
  • - मूत्रवाहिनी व किडनीवर सूज येऊन किडनी फेल्युअरसारखी गंभीर समस्या निर्माण होणे. 
  • - मूत्राशयात खडा तयार होणे. 
  • बी.पी.एच.वरील उपचार : 

1. औषधोपचार : सुरवातीस प्रोस्टेटवरील विशिष्ट औषधांनी बऱ्याच रुग्णांना चांगला आराम मिळतो. 
2. दुर्बिणीने बिनटाक्‍याचे उपचार : (TURP transurethral resection of prostate). बी.पी.एच.च्या 
उपचाराची ही एक सोपी व परिणामकारक पद्धत आहे. औषधोपचाराने विशेष फायदा होत नसल्यास 
किंवा प्रोस्टेटमुळे इतर गंभीर समस्या निर्माण होत असल्यास रुग्णाची प्रोस्टेट ग्रंथी सध्या या पद्धतीने 
काढली जाते. या पद्धतीत ऑपरेशन करण्याची (चिरफाड व टाके घालण्याची) आवश्‍यकता नसते. या 
पद्धतीत युरॉलॉजिस्ट मूत्रनलिकेतून दुर्बीण घालून प्रोस्टेट ग्रंथीचा, अडथळा निर्माण करणारा भाग योग्य 
प्रमाणात काढतात. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला साधारणपणे दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागते. 
TURP कमी खर्चिक व मिळणारा आराम लवकर व चांगला असल्यामुळे जगभरात प्रोस्टेटच्या उपचारासाठी 
सर्वाधिक वापरली जाणारी ही शस्त्रक्रिया प्रणाली आहे. 
3. शस्त्रक्रियेद्वारे (open operation) उपचार : जेव्हा प्रोस्टेट ग्रंथी फार जास्त वाढलेली असते किंवा 
त्याबरोबर इतर समस्या, जसे मूत्राशयात खडे असतात व तपासणीनंतर दुर्बिणीने परिणामकारक उपचार 
करणे कठीण वाटल्यास काही रुग्णांवरील उपचार ऑपरेशनने (चिरा देऊन, टाके घालून) करावे लागतात. 
प्रोस्टेटची वाढ आणि लघवीचा त्रास या समस्या आज बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येतात. बी.पी.एच.च्या 
उपचाराकरिता परिणामकारक चिकित्साप्रणाली उपलब्ध आहेत. वेळीच उपचार केल्याने गंभीर समस्या टाळता येऊ शकतात. 

- डॉ. नीरज शशिकांत गांधी 
MBBS, MS, M.Ch Urology 
त्रविकार तज्ज्ञ.