esakal | डॉक्टर म्हणतायत, 'घाबरू नका, कोविड बरा होतो'

बोलून बातमी शोधा

डॉक्टर म्हणतायत, 'घाबरू नका, कोविड बरा होतो'
डॉक्टर म्हणतायत, 'घाबरू नका, कोविड बरा होतो'
sakal_logo
By
शर्वरी जोशी

सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सध्या केवळ कोरोना या एकाच विषाणूची चर्चा रंगली आहे. जगाला विळखा घालणाऱ्या या विषाणूने प्रत्येकाचं जीवन असहाय्य केलं आहे. त्यामुळे सध्या सगळ्याच स्तरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच सोशल मीडियावर अनेक अफवांना उधाण आलं असून नागरिकांमध्ये समज-गैरसमज निर्माण झाले आहेत. अनेक जण खात्री न करता अफवांवर विश्वास ठेवू लागले आहेत. विशेष म्हणजे कोविड लस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोविड पूर्णपणे बराच होत नाही, अशी अफवा नागरिकांमध्ये पसरली आहे. मात्र, डॉ. प्रविणकुमार जरग यांनी सत्य परिस्थिती नेमकी काय आहे हे सांगितलं आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड हा बरा होणारा आजार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असा सल्ला त्यांनी दिला आहे.

हेही वाचा: रेमेडिसिवीर मिळालं नाही तर घाबरु नका; डॉक्टर सांगतात...

"कोविड १९ हा बरा होणारा आजार आहे. महामारीच्या काळात संसर्गाला घाबरून न जाता प्रत्येक व्यक्तीने त्यावर मात करण्यासाठी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार ८० टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून येतात. तर, १० ते १५ टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज भासते. यापूर्वी देखील देशात अनेक महामारीसारखी संकटं आली होती आणि त्यावर आपण यशस्वीरित्या मात केली असून या कोरोना महामारीवर देखील आपण नक्कीच मात करू शकतो",असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सध्याच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर प्रत्येकाने भर दिला पाहिजे. तसंच वेळोवेळी हात धुणे, मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळणे अशा काही मुलभूत व गरजेच्या नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे.