esakal | गुळवेलाचा जनुकीय आराखडा पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

gulwel

गुळवेलाचा जनुकीय आराखडा पूर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: कोरोनामध्ये सर्वाधिक वापरात आलेली आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे गुळवेल! आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरण्यासाठी गुळवेलाचा जनुकीय आराखडा (क्रमनिर्धारण) आवश्यक होता. ती गरज आता भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) भोपाळच्या शास्त्रज्ञांनी पूर्ण केली आहे. १९ हजार ४७४ जनुकांचे आराखडा शास्त्रज्ञांनी पूर्ण केला आहे.

हेही वाचा: पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना पुणेकरांची पसंती

गुळवेलाचे (टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) जगातील हे पहिले जनुकीय क्रमनिर्धारण असल्याचे आयसर भोपाळचे सहायक प्राध्यापक डॉ. विनीत शर्मा यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यांच्या नेतृत्वात श्रुती महाजन, अभिषेक चक्रवर्ती आणि टायटास सील यांनी हे संशोधन केले आहे. बायोअर्काईव्ह या शोधपत्रिकेत या संबंधीचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. गुळवेलाचे आयुर्वेदिक फायदे शास्त्रीय आधारावर सिद्ध करण्यासाठी या संशोधनाचा मोठा फायदा होणार आहे.

आयुर्वेदातील गुळवेलाचा वापर

कर्करोग, ज्वर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, नेत्र विकार, पंडुरोग, प्रमेह, मधुमेह, मूत्रविकार, यकृत विकार, रक्तशर्कराविकार, वमनविकार, संग्रहणी, सर्दी पडसे, हृदयविकार आदींसाठी होतो. जनुकीय क्रमनिर्धारणाच्या आधारे गुळवेल पुन्हा एकदा आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरत आहे. - वैद्य विनायक खडीवाले, पुणे

संशोधनाचे फायदे

उत्तम प्रतीच्या आयुर्वेदिक गुणधर्माच्या प्रजातींची निवड करता येईल

गुळवेलाचे उत्पादन आणि आयुर्वेदिक मूल्य वाढविण्यासाठी संशोधनात उपयोगी

विविध रोगांवरील गुळवेलाचा उपयोग वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करता येईल

गुळवेलांच्या दर्जेदार औषधांची निर्मिती आणि परिणामकारकता तपासता येईल

आयुर्वेदिक संशोधनासाठी जनुकीय क्रमनिर्धारणाचा फायदा होईल

loading image
go to top