Tips for Reduce Hair Fall, Dandruff | केस खूप गळतात, कोंडा झालाय.. हे उपाय पडतील उपयोगी|Beauty Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tips for Reduce Hair Fall & Dandruff
केस खूप गळतात, कोंडा झालाय.. हे उपाय पडतील उपयोगी

केस खूप गळतात, कोंडा झालाय.. हे उपाय पडतील उपयोगी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आयुर्वेदात कडुलिंबाचे महत्व (Importance of Neem Tree) जास्त असून त्याचा अनेक रोगांवर उपचारासाठी फायदा होतो असे म्हटले आहे. कडुलिंबात व्हिटॅमिन ई-सी, कॅरोटीनॉइड्स, लिनोलिक अॅसिड, ओलेइक अॅसिड, स्टीरिक अॅसिड आणि पाल्मिटिक अॅसिड सारखे घटक असतात, यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते. कडुलिंब पेस्ट, पावडर आणि तेल अशा स्वरूपात वापरता येतो. हे तीनही प्रकार तुम्ही तुमच्या त्वचा, केस आणि चेहऱयासाठी वापरू शकता. त्वचा आणि केसांसाठी कडुलिंब खूप फायद्याचा आहे. (Tips for Reduce Hair Fall & Dandruff)

केस गळती थांबते (Reduce Hair fall) -

कडुलिंबाच्या तेलामध्ये दाहक-विरोधी, प्रतिजैविक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे टक्कल पडण्यापासून तुम्ही वाचू शकता. याशिवाय कडुलिंबाच्या पाण्याने डोके धुतल्याने केस गळणे थांबते. तसेच केस लांब आणि मजबूत होतात.कडुलिंबाच्या अर्कामध्ये लिनोलिक, ओलेइक आणि स्टीरिक ऍसिड असतात. यामुळे केसातील कोरडेपणा दूर होऊन ते चमकदार होतात.

कोंड्यापासून मुक्ती (Reduce Dandruff) -

कोंडा झाला असल्यास कडुनिंबाचा अर्क लावाला असे सांगितले जाते, या अर्कामध्ये गेडुनिन आणि निंबिडॉलमधील बुरशीविरोधी गुणधर्म असल्याने ते कोंडा कमी करण्यास मदत करतात. याशिवाय डोक्यात सूज आली असेल, खाज सुटत असले तसेच जळजळ, फंगल इन्फेक्शन असेल तर तीही समस्या दूर होते. तसेच डोक्यातल्या उवाही मरतात.

केस पांढरे होत नाहीत- केस अकाली पांढरे होणे ही एक समस्या आजकाल पाहायला मिळते. हार्मोनल असंतुलन, तणाव असेल तर केस पांढरे लवकर होतात. अशावेळी कडुलिंबातील अँटीऑक्सिडंट्स हा घटक केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करतो.

loading image
go to top