
भारतीय लपवितात डोकेदुखी! ६० टक्के नागरिक त्रस्त
नागपूर : शहरामध्ये राहणाऱ्या भारतीयांपैकी ६० टक्के लोकांना तणावामुळे डोकेदुखीचा त्रास आहे. चार पैकी एक व्यक्ती त्यांना होणारी डोकेदुखी लपवतात आणि कुटुंबीयांना त्याबाबत सांगतही नसल्याचे डोकेदुखीच्या संदर्भात केलेल्या सर्वेक्षण अहवालातून समोर आले आहे.
भारतीय शहरांतील लोकांमध्ये वाढत जाणाऱ्या या डोकेदुखीची वारंवारता कशाप्रकारे वाढत आहे त्याबाबत माहिती घेण्यात आली आहे. एचएएनएसए संशोधनामध्ये आढळून आल्यानुसार: नवी दिल्ली भारतामधील चार सर्वाधिक तणावग्रस्त शहरांपैकी प्रमुख शहर आहे. हा अभ्यास दहा हजार प्रतिसादकर्त्यांसह १४ राज्यांमधील २४ शहरांमध्ये करण्यात आला. त्यात अनेक आश्चर्यकारक परिणाम समोर आले.
ज्यामध्ये ९० टक्के लोकांना तणावामुळे उद्भवणारी डोकेदुखी होत असल्याचे समोर आले. २२-४५ वर्ष वयाच्या शहरी भारतीय नागरिकांमध्ये कोणत्या प्रकारच्या शारीरिक समस्या आढळतात याबाबत व्यापक दृष्टिकोन सादर करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये एनसीसीएसच्या साहाय्याने घेण्यात आलेल्या सहभागींच्या मुलाखतीत मजेशीर माहिती प्राप्त झाली आहे.
त्यात त्यांच्या वाढत्या डोकेदुखीला अधोरेखित करण्यात आले. ज्यामुळे तणाव, डोकेदुखी वाढण्यास प्रवृत्त करणारी लक्षणे त्याचबरोबर लोक शोधत असलेल्या उपायांबद्दल देखील सखोल माहिती अधोरेखित झाली आहे. सॅरिडॉन डोकेदुखी अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.