esakal | 'या' फळाचे अतिसेवन ठरू शकते धोकादायक! जाणून घ्या दुष्परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

grapes

द्राक्षांतील सॅलिसिलीक ऍसीड अन्नाच्या पचनात मोठी अडचण येते. कारण द्राक्षांतून मोठ्या प्रमाणात सॅलिसिलीक ऍसीड मिळते

'या' फळाचे अतिसेवन ठरू शकते धोकादायक! जाणून घ्या दुष्परिणाम

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: Disadvantages Of Grapes:  द्राक्षे हे आरोग्यासाठी उत्तम असतात. पण त्यांचं सेवन अति प्रमाणात केल्यास त्याचे तोटेही सहन करावे लागू शकतात. द्राक्षांमधून विविध जिवनसत्वे, खनिजे तसेच फायबर मिळते जे शरीरासाठी आवश्यक असते. चला तर जाणून घेऊया द्राक्षांच्या अतिसेवनाचे तोटे.

द्राक्षांतील सॅलिसिलीक ऍसीड अन्नाच्या पचनात मोठी अडचण येते. कारण द्राक्षांतून मोठ्या प्रमाणात सॅलिसिलीक ऍसीड मिळते. तसेच जास्त प्रमाणाच द्राक्षे खाल्ली तर हगवणही लागते. तसेच अति द्राक्ष सेवन वजन वाढीचेही एक कारण सांगितले जाते. 

थायरॉईडपासून बचाव करण्यासाठी खावा हे पदार्थ

1. पोट बिघडू शकते-
द्राक्षांमध्ये सॅलिसिलीक ऍसीड जास्त प्रमाणात असते. काही संशोधनात या ऍसीडचे दुष्परिणाम समोर आले आहेत. ज्यामुळे जठरात सुज येणे, पोट दुखने, हगवण हा त्रास होऊ शकतो. बऱ्याचदा जास्त प्रमाणात द्राक्षे खाल्ल्याने अपेंडिसाइटिसचाही त्रास झाल्याचे उघड झाले आहे.

2. अतिसाराची समस्या असू शकते-
जास्त प्रमाणात उच्च साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने अतिसार होऊ शकतात. काही संशोधनात असे दिसून आले आहे की शुगर अल्कोहोल, साखरेमध्ये आढळणारी एक सेंद्रिय कंपाऊंड ज्यामुळे अतिसार होऊ शकते. द्राक्षातील साखरेमुळे अतिसार होऊ शकतो हे अनेक संशोधनातून समोर आले आहे.

स्वस्थ आणि मजबूत सांधे ठेवण्यासाठी काही गाइडलाइन फॉलो कराच

3. वजन वाढू शकते-
जास्त द्राक्षे खाल्ल्याने तुमचा शरीराचा उष्मांक वाढू शकतो. द्राक्षांमध्ये कॅलरी जास्त असते. जास्त द्राक्षे खाल्ल्याने वजन वाढू शकते याविषयी कोणतेही संशोधन झाले नाही, परंतु असा विश्वास आहे की जास्त द्राक्षे खाल्ल्यास तुमचे वजन वाढू शकते.

4. गरोदरपणात द्राक्षे खाऊ नये-
द्राक्षामधून रेसवेराट्रॉलचे प्रमाण वाढते, जे रेड वाइनमध्ये आढळणारे एक पॉलीफेनॉल देखील आहे. होणाऱ्या बाळासाठी रेसवेराट्रॉल धोकादायक ठरू शकते.

कुंदरूच्या आरोग्याशी संबंधित जाणून घ्या फायदे

5. ऍलर्जीही होऊ शकते-
द्राक्षांची ऍलर्जी फारच कमी आहे.  द्राक्षातील विशिष्ट प्रोटीन, ज्याला ग्रेप्स लिपिड ट्रान्सफर प्रोटीन म्हणतात, यामुळे व्यक्तींमध्ये तीव्र ऍलर्जी दिसून येते. द्राक्षे देखील अ‍ॅनाफिलेक्सिसस कारणीभूत ठरू शकतात, जी जीवघेणा ठरू शकतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image