Garlic Milk प्यायलात का? हे आहेत 10 फायदे|Health Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Garlic Milk प्यायलात का? हे आहेत 10  फायदे
Garlic Milk प्यायलात का? हे आहेत 10 फायदे

Garlic Milk प्यायलात का? हे आहेत 10 फायदे

रोज दूध पिणे अतिशय चांगले मानले जाते. कारण त्यात पोषक घटक असतात. तर लसूणही भारतीय जेवणात अतिशय महत्वाची भूमिका बजावते. लसूणमध्ये जीवनसत्त्वे B6 आणि C, फायबर, कॅल्शियम, प्रोटीन आणि मॅंगनीज असे अनेक घटक असतात. आरोग्यासाठी ते अत्यंत चांगले असल्याने आपल्याकडे लसूण विविध पदार्थात घातली जाते. त्यामुळे दूध आणि लसूण एकत्र करून दूध प्यायल्याने तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा होईल. हे दूध पिण्याचे असे आहेत फायदे.

हेही वाचा: आजीबाईच्या बटव्यातून; करा हे घरगुती उपाय

1) तुम्हाला सायटिका असल्यास कंबरेपासून पायांपर्यंत नसांमध्ये असह्य वेदना होतात. मात्र, रोज एक ग्लास लसणाचे दूध प्यायल्याने दुखण्यापासून आराम मिळतो.

2) 30 मि.ली. दुधात लसणाच्या पाच पाकळ्या घालून ते दूध उकळून प्यायचे. हे दूध प्यायल्याने दमा असेल तर आराम मिळतो.

3) मधुमेहाच्या रूग्णांसाठी हे दूध फायदेशीर आहे. दूध पिऊन तुमची साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच रक्तदाबही नियंत्रित राहत असल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

4) या दूधात प्रथिने, जीवनसत्त्वे, फॉस्फरस, लोह यांसारखे गुणधर्म आहेत, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे कुठल्याही संसर्गापासून तुम्ही दूर राहता.

5) लसणाचे दूध अँटीबायोटिक सारखे काम करते, ज्यामुळे नसांमध्ये वेदना होत असतील तर त्यापासून आराम मिळतो. यात अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. त्यामुळे वेदना कमी होतात.

6) लसणाच्या दोन पाकळ्या बारीक करून त्या 1 ग्लास दुधात उकळा आणि थंड झाल्यावर प्या. असे दूध नियमित प्यायल्याने हृदयविकार होत नाही.

7) सर्दी खोकला झाला असल्यास लसणाचे दूध प्यायल्याने आराम मिळतो. न्यूमोनिया होण्यापासून तुम्ही दूर राहता.

8) लसणाचे दूध प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता या समस्या निर्माण होत नाहीत. तसेच आतडेही स्वच्छ राहत असल्याने आराम मिळतो.

9) स्तनपान सुरू असताना एक ग्लास दुधात उकडलेली लसूण घालून दूध पिणे अत्यंत चांगले. त्यामुळे दूध भरपूर निर्माण होते. शिवाय स्तनपान करताना समस्या येत नाहीत.

10) जर तुम्हाला तोंडात फोड आले असतील दुध आणि लसूणात मध एकत्र करून प्या. त्यामुळे त्रास कमी होईल.

हेही वाचा: Health Tips : जास्त ड्रायफ्रुट्स खाताय? पडू शकता आजारी

loading image
go to top