Health Tips : जास्त ड्रायफ्रुट्स खाताय? पडू शकता आजारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dry Fruit

सुक्या मेव्यामध्ये आढळणारे अनेक पोषक घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.

Health Tips : जास्त ड्रायफ्रुट्स खाताय? पडू शकता आजारी

सुका मेवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. म्हणूनच प्रत्येकाने त्यांचे सेवन केले पाहिजे. सुक्या मेव्यामध्ये आढळणारे अनेक पोषक घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. मुख्यतः हिवाळ्यात त्यांचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला माहितेय का की, सुका मेवा जास्त खाल्ल्याने देखील समस्या उद्भवू शकतात. होय, तज्ज्ञांचे असेही मत आहे की, ड्रायफ्रुट्सचे जास्त सेवन केल्याने तुमच्या शरीरात काही समस्या निर्माण होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल...

ड्रायफ्रुट्सच्या अतिसेवनामुळे तुम्हाला दातांसंबंधी समस्या उद्भवू शकतात. कारण सुक्या मेव्यामध्ये साखर असते, जी दातांना चिकटते. ज्यामुळे तुमचे दात किडण्याची शक्यता असते. सुका मेवा खाल्ल्यानंतर नेहमी ब्रश करावा, असेही तज्ज्ञ सांगतात. याशिवाय दातांची समस्या टाळण्यासाठी ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानंतर पाणी प्यावे.

हेही वाचा: दिलासादायक! ऐन हिवाळ्यात सुका मेवा झाला स्वस्त

Dry Fruits

Dry Fruits

आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांपैकी फायबर हे एक आहे, जे आतड्यांसंबंधी हालचालींचे नियमन आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे पोषक तत्वांनी युक्त ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खूप फायदा होतो. पण ते जास्त खाल्ल्याने आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. सुक्या मेव्याच्या अतिसेवनामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, पेटके, गोळा येणे आणि जुलाब होऊ शकतात. त्यामुळे ड्रायफ्रुट्सचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे.

जे लोक जास्त ड्रायफ्रुट्स खातात त्यांना दम्याचा त्रास होऊ शकतो. कारण सल्फर डायऑक्साइडचा वापर सुकामेवा जपण्यासाठी केला जातो, जो प्रत्यक्षात धोकादायक घटक आहे. सल्फर डायऑक्साइडचा वापर ब्लीचिंग एजंट आणि जंतुनाशक म्हणूनही मोठ्या प्रमाणावर केला जातो.

हेही वाचा: सुका मेव्यापेक्षा फायदेशीर गूळ-फुटाणे, फायदे वाचून व्हाल चकित

dry fruits

dry fruits

आता अनेक सुक्या मेव्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. ज्यामुळे तुमच्या शरीराच्या रक्तातील साखरेमध्ये चढ-उतार होऊ शकतात. या चढउतारामुळे माणसाला अचानक जास्त साखर खाण्याचे व्यसन लागते आणि तो मोठ्या प्रमाणात गोड खाऊ लागतो. तसेच, मनुका (किशमिश) मध्ये सर्वात जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image
go to top