स्वादिष्ट चिक्कू आहे आरोग्यदायी; नियमित सेवनाचे आहेत अनेक फायदे

chikoo
chikoo
Updated on

नवी दिल्ली : चिक्कू एक स्वादिष्ट फळ आहे. तसेच ते एक आरोग्यदायी फळदेखील आहे. हे फळ खाऊन आपण अनेक गंभीर अशा आजारांपासून वाचू शकतो. या फळातील अनेक पोषक तत्त्व आपल्या शरीराला आरोग्यदायी ठेवण्यासाठी मदत करतात. जर आपण या फळाचे सेवन दररोज करत असाल, तर आपल्या शरीरातील इम्यूनिटी गतीने वाढू शकते. तसेच चिक्कू आपल्या शरीराला सुदृढ बनवण्यास मदत करतो. चिक्कूच्या सेवनाने आपण कँसर सारख्या गंभीर आजारांपासून वाचू शकतो. चिक्कू आपल्या शरीराला फिट ठेवण्याबरोबरच आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यास देखील सहाय्यकारी ठरतो. चिक्कू खायचे काय फायदे आहेत, ते पाहूया. 

हेही वाचा - डोकेदुखीने हैराण आहात..मग औषधी नको हे घरगुती उपाय करून पहा
1. कँसरसारख्या आजारांपासून वाचण्यासाठी मदतनीस
चिक्कूमध्ये विटामिन ए, विटामिन बी, आयरन, कॅल्शियम, फायबर, एंटीऑक्सिंडट असतात आणि एंटी बॅक्टीरियल सारखे अनेक गुण असतात. यामुळे कँसरच्या पेशी वाढण्यास आळा बसतो. जर आपण दररोज चिक्कू फळ खात असाल तर आपण कँसर सारख्या आजारापासून वाचू शकता. 
2. डोळ्यांची कार्यक्षमता वाढवतोचिक्कूमध्ये विटामिन-ए मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे डोळ्यांची कार्यक्षमता वाढते. जर आपण दररोज चिक्कूचे सेवन करत असाल तर आपल्या डोळ्यांची समस्या दूर होऊ शकते. म्हणूनच आपल्या दैनंदिन आहारात चिक्कूचा समावेश जरुर करा. 

हेही वाचा - पुरूषांनी दररोज मूठभर तरी मखाने खाल्ले पाहिजे, जाणून घ्या जबरदस्त फायदे
3. चिक्कू खाल्याने वाढते सौंदर्य
चिक्कू अनेक गुणांनी समृद्ध असे फळ आहे. चिक्कू खाल्याने फक्त शरीर आरोग्यदायी राहत नाही तर आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य देखील वाढते. चिक्कूत असणारे एंटी ऑक्सिडंट, एंटी व्हायरस आणि एंटी बॅक्टीरियल गुण आपल्या त्वचेला तजेलदार आणि स्वस्थ राहण्यासाठी मदत करतात. 
4. मानसिक तणाव होतो कमी
आज धक्काधक्कीच्या आयुष्यात अनेक लोक मानसिक तणावाने ग्रस्त असतात. त्यामुळे जर चिक्कूचे सेवन दररोज केले गेले तर आपला मानसिक तणाव कमी होऊन मन देखील शांत राखण्यास मदत होतं. चिक्कू खाल्याने चांगली झोप लागते. 
5. सर्दी-खोकला होतो दूर
सर्दी-खोकला झाल्यानंतर आपल्या छातीत कफ होतो. त्यामुळे आपल्याला श्वासोच्छवास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे जर आपण चिक्कूचं सेवन केलंत तर आपल्या कफास नाकावाटे बाहेर काढण्यास तो मदत करेल तसेच आपल्या श्वासोच्छवास घेताना आरामदायी वाटू शकतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com