esakal | रोज करा धनुरासन! आरोग्यासाठी मिळतील जबरदस्त फायदे
sakal

बोलून बातमी शोधा

रोज करा धनुरासन! आरोग्यासाठी मिळतील जबरदस्त फायदे

रोज करा धनुरासन! आरोग्यासाठी मिळतील जबरदस्त फायदे

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

धनुरासन हे असे आसन आहे, ज्यावर शरीराची मुद्रा धनुष्यासारखी दिसते. म्हणूनच त्याला धनुरासन म्हणतात. हे पाचक प्रणाली मजबूत करते आणि हाडांच्या स्नायूंचे तापमान वाढवते. याशिवाय, हे पाठीच्या हाडांमध्ये लवचिकता आणते. धनुरासनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मधुमेहाप्रमाणेच, पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आणि मांड्यांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी हे फायदेशीर आहे. चला तर मग त्याचे फायदे जाणून घेऊयात.

हेही वाचा: वाढलेलं वजन कमी करायचंय? भिजवलेले शेंगदाणे खा, जाणून घ्या फायदे

धनुरासन करण्याचे फायदे...

- डिप्रेशनची लक्षणे कमी करण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे.

- हे लठ्ठपणा कमी करण्याचे काम करते आणि शरीर संतुलित ठेवते.

- पोटाचे स्नायू शरीराच्या बळकटीकरणासाठी प्रभावी.

- हे आसन स्नायू आणि हाडे लवचिक बनवते.

- पाठ किंवा कंबरदुखी सारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त

- हे आसन केल्याने हातांमध्ये बळकटी येते.

- मणक्याचे हाडे मजबूत होतात.

- अपचन आणि पोटाचे विकारही या आसनामुळे दूर होतात.

- हे आसन केल्याने भूक वाढते.

हेही वाचा: जेवणात नेहमीच असावी ज्वारीची भाकरी? जाणून घ्या फायदे

या लोकांनी करू नये धनुरासन...

ज्या लोकांना पाठदुखी, पोटदुखी आणि अल्सर, मायग्रेन किंवा डोकेदुखी, उच्च आणि निम्न रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी हे आसन करणे टाळावे. गर्भवती महिलांनीही हे आसन करू नये.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image
go to top