esakal | लहान मुलांसाठी कोरोना गाईडलाइन्स; घ्या चिमुकल्यांची काळजी

बोलून बातमी शोधा

corona
लहान मुलांसाठी कोरोना गाईडलाइन्स; घ्या चिमुकल्यांची काळजी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने नागरिकांना नकोसं केलं आहे. आतापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाउन आणि नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. मात्र, अद्यापही रुग्णसंख्येत म्हणावी तशी घट झालेली नाही. या विषाणूचा परिणाम मोठ्यांसोबतच आता लहान मुलांवरही होत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आरोग्य मंत्रालयाकडून लहान मुलांसाठी गाईडलाइन्स जारी करण्यात आली आहे.

१. लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांना खोकला, हलका ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा खशात खवखव अशी लक्षणे जाणवतात. तसंच काही मुलांमध्ये पोटादुखीचाही त्रास होतो. अशा वेळी मुलांना होम आयसोलेशनच्या माध्यमातून उपचार करता येऊ शकतो.

हेही वाचा: Video : तरुण व लहान मुलांवर होणार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम?

२. तज्ज्ञांच्या मते, ९० ते १०० दरम्यान ऑक्सिजन लेव्हल असावी. परंतु, जर मुलांची ऑक्सिजन लेव्हल कमी-जास्त झाली तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

३. मुलांना ताप आला तर त्यांना पॅरासिटामोल देण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. त्यामुळे मुलां दर चार तासाने पॅरासिटामोल ( १०-१५ मिलीग्रॅम) द्यावं. परंतु, त्यापूर्वीदेखील डॉक्टरांचा सल्ला एकदा नक्की घ्यावा.

४. उन्हाळ्यात अनेकदा वातावरणातील बदलामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. त्यामुळे मुलांना हा त्रास होऊ नये यासाठी त्यांच्या आहारात फळे, भाज्या यांचा समावेश करावा.

५. लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षण जाणवल्यास कोणत्याही प्रकारचे अॅटी बायोटिक्स देऊ नये. त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

६. मुलांना शक्यतो एन -95 मास्क द्यावा.

( ही बातमी केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आलेली आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)