व्हायरल हेपेटायटीस म्हणजे काय? जाणून घ्या कारणे, उपचार

सायलेंट किलर म्हणून ओळखला जाणारा आजार म्हणजे हेपेटायटीस Hepatitis
stomach pain
stomach painesakal

सायलेंट किलर म्हणून ओळखला जाणारा आजार म्हणजे हेपेटायटीस Hepatitis. गेल्या काही काळात हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या आजाराची लक्षणे पटकन समजून येत नसल्यामुळे तो बळावत असल्याचं निदर्शनास येत आहे. म्हणूनच व्हायरल हेपेटायटीस म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती व उपचार पद्धतीने कोणती ते पाहुयात.

व्हायरल हेपेटायटीस काय आहे?

यकृत हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. पोषक तत्त्वांवर प्रक्रिया करणे, रक्त शुद्ध करणे आणि संसर्गाविरोधात लढणे ही यकृताची कार्ये आहेत. व्हायरल म्हणजेच विषाणूजन्य हेपेटायटीसमध्ये हेपेटायटीस ए, बी, सी, डी आणि ई विषाणूंचा संसर्ग जेव्हा यकृतामध्ये होतो, तेव्हा यकृताला सूज येते. हे विषाणू यकृताला हानी पोहोचवतात आणि त्याच्या कार्यांवर परिणाम करतात. त्यामुळे शरीरात टॉक्सिन्स अर्थात विषारी पदार्थ निर्माण होतात. याच कारणामुळे लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सर देखील होऊ शकतात.

stomach pain
वारंवार पोट दुखतंय?; जाणून घ्या हेपेटायटीसचे प्रकार,लक्षणे

यकृतासाठी धोका -

हेपेटायटीस ए आणि ई विषाणूंच्या संसर्गामुळे गंभीर स्वरूपाचा विषाणूजन्य हेपेटायटीस होऊ शकतो. कित्येक रुग्णांमध्ये हा आजार काही आठवड्यात किंवा काही महिन्यांमध्ये आपोआप बरा होतो. पण काही दुर्मिळ केसेसमध्ये रुग्णाच्या यकृताचे कार्य वेगाने बंद पडू लागते, अशावेळी जर तातडीने यकृत प्रत्यारोपण केले गेले नाही तर जीवावर देखील बेतू शकते.

हेपेटायटीस बी आणि सी मुळे क्वचितच प्रसंगी यकृताचे गंभीर नुकसान होऊ शकते. पण हे विषाणू व्यक्तीच्या शरीरात राहतात आणि बऱ्याच कालावधीनंतर लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सरला कारणीभूत ठरतात.

हेपेटायटीस लक्षणे -

हेपेटायटीस ए आणि ई हे सामान्यतः प्रदूषित खाद्यपदार्थ आणि पाण्यामार्फत होतो. अस्वच्छ भागांमध्ये या आजाराचं प्रमाणात जास्त असल्याचं पाहायला मिळतं. संसर्ग झालेल्या व्यक्तीला काही वेळा कोणतीच लक्षण जाणवत नाहीत. किंवा कावीळ, पोटदुखी, मळमळ, उलट्या, भूक न लागणे, ताप, सर्वसामान्य अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात.

घ्या ही काळजी -

१. स्वच्छता बाळगा.

२. नेहमी शुद्ध पाणी प्या, शौचालय, घर, आजूबाजूचा सर्व परिसर कायम स्वच्छ ठेवा.

३. सर्वांचे लसीकरण झालेले असणे महत्त्वाचे आहे.

४. रक्त व रक्त उत्पादनांची सुरक्षा अबाधित राखली जावी.

५. असुरक्षित लैंगिक संबंध ठेवू नयेत.

उपचार-

गंभीर स्वरूपाचा हेपेटायटीस झालेला असल्यास आराम करावा, भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करावे आणि निरोगी, पोषक व संतुलित आहार घ्यावा. सहायक औषधांमुळे लक्षणांपासून आराम मिळण्यात मदत होऊ शकते.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे किंवा पर्यायी औषधे घेऊ नयेत. अशा औषधांमुळे यकृताला नुकसान पोहोचू शकते.

गंभीर स्वरूपाच्या हेपेटायटीस (हेपेटायटीस बी आणि सी) मध्ये दीर्घकालीन गुंतागुंत रोखण्यासाठी लवकरात लवकर निदान आणि उपचार होणे आवश्यक आहे. विषाणूजन्य हेपेटायटीसचे निदान जर विषाणूने यकृतावर परिणाम करण्याच्या आधी झाले तर हा आजार बरा करण्यासाठी प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. काही केसेसमध्ये जर यकृताचे गंभीर नुकसान आधीच झालेले असेल तर यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता भासू शकते.

(लेखक डॉ. कांचन मोटवानी या मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये एचपीबी अँड लिव्हर ट्रान्सप्लांट कन्सल्टन्ट आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com