Health News : श्रावणात 'या' पालेभाज्या खात असाल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा आरोग्यावर होईल मोठा परिणाम!

'उपवासाच्या माध्यमातून पचनसंस्थेला जर तुम्ही विश्रांती नाही दिली तर भविष्यात गंभीर आजारही होऊ शकतात.'
Leafy Vegetables
Leafy Vegetablesesakal
Summary

श्रावणात पालक, मेथी, लाल भाजी, चाकवत, कोबी, पत्ताकोबी अशा पालेभाज्या खाणे चांगले मानले जात नाही.

Health News : श्रावणात (Shravan) व्रत वकैल्य अधिक असल्याने या कालावधीत उपवास अधिक प्रमाणात केले जातात. उपवासातून सकारात्मक ऊर्जा मिळते. उपवासाचा अर्थ पूर्ण उपाशी राहून शरीर कमकुवत करणे असा नाही तर अन्नाचे प्रमाण कमी करून शरीराला काही काळ विश्रांती देणे असा आहे.

Leafy Vegetables
Sharad Ponkshe : राजमाता जिजाऊंनी शिवरायांना श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या गोष्टी शिकवल्या; मराठी अभिनेत्याचं वक्तव्य

त्यातून विषारी घटक काढून टाकावे लागतात. उपवास करताना चरबी जाळण्याची प्रक्रिया जलद होते. त्यामुळे चरबी झपाट्याने वितळू लागते आणि जर तुम्ही उपवास केला नाही तर चरबी वाढतच जाते आणि तुमच्या हाडांवरचा भार वाढत जातो. त्यामुळे या शास्त्रोक्त पद्धतीने उपवास करण्याचा सल्ला डॉक्टर व आयुर्वेदिक तज्ज्ञही देतात.

सोलापुरातील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यामिपका डॉ. श्रुती तारापुरे म्हणाल्या, श्रावणात पालक, मेथी, लाल भाजी, चाकवत, कोबी, पत्ताकोबी अशा पालेभाज्या खाणे चांगले मानले जात नाही. धार्मिक कारणास्तवही ते शुभ नाही आणि आरोग्यालाही नुकसान पोचवते.

Leafy Vegetables
NCP Crisis : राष्ट्रवादीचा नाराज गट अजित पवारांच्या लागला गळाला? शरद पवारांच्या दौऱ्यात नाराजी उघड

या ऋतूमध्ये त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया आणि कीटकांचे प्रमाण वाढते. उपवासाच्या माध्यमातून पचनसंस्थेला जर तुम्ही विश्रांती नाही दिली तर भविष्यात गंभीर आजारही होऊ शकतात. मानसिक क्षमतेवरही परिणाम होतो. उपवास केल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. शरीर निरोगी होते. शरीर निरोगी असेल तर मन आणि मेंदूही निरोगी राहतात.

चतुर्मासातील काही विशेष दिवशी उपवास करावा ज्यामुळे रोग आणि दुःख दूर होतात. उपवासाने शरीर चपळ होते, शक्ती मिळते. उपवासाने रोप्रतिकारशक्ती वाढते. व्रत धारण केल्याने मनात दृढनिश्चयाची भावना वाढते. केवळ दृढनिश्चयी मनामध्ये सकारात्मकता, दृढता आणि सचोटी असते. जिद्द असणारा माणूसच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतो. ज्या व्यक्तीच्या मनात, कृतीत दृढता किंवा दृढनिश्चय नाही तो मृत समजला जातो असेही डॉ. तारापुरे यांनी सांगितले.

Leafy Vegetables
Solapur Politics : 83 वर्षाच्या योद्ध्याची नेत्यांना धास्ती; पवारांच्या 'या' खेळीचा अंदाज कोणालाच लागत नाही, दिग्गजांना चिंता

श्रावणात आपले शरीर खूप अशक्त होते. मंद चयापचय ते कमकुवत पचनसंस्था, संक्रमणाचा धोका आणि सुस्ती या सर्व आरोग्य समस्यांशी संबंधित आहे. सूर्य - चंद्राच्या प्रकाशाची कमतरता असते ज्याचा परिणाम अन्नपदार्थावर होतो. त्यामुळे अन्नपदार्थ लवकर संक्रमित होतात. पावसाळ्यात जीवाणू आणि रोग जास्त प्रमाणात आढळतात. ओलसर परिस्थिती आणि संक्रमणास प्रोत्साहन देते. पोटदुखी, अपचन किंवा अन्न विषबाधा होऊ शकते.

- डॉ. श्रुती तारापुरे, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com