esakal | डायबिटीज नियंत्रणात आणायचाय? मग फॉलो करा 'हे' डाएट
sakal

बोलून बातमी शोधा

healthy diet.

डायबिटीज नियंत्रणात आणायचाय? मग फॉलो करा 'हे' डाएट

sakal_logo
By
शर्वरी जोशी

बदलती जीवनशैली आणि चुकीची आहारपद्धती यांच्यामुळे सध्याच्या काळात अनेकजण शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत. त्यातच दर १० व्यक्तींमागे ६ जणांना डायबिटीज म्हणजेच मधुमेहाची समस्या असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, गेल्या काही काळात रुग्ण डायबिटीजकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे. त्यामुळे अनेकदा त्यांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणूनच, मधुमेहींनी आहारात कोणत्या फळांचा व भाज्यांचा समावेश करावा, कोणती फळे व भाज्या खाऊ नये हे आज आपण पाहणार आहोत. (health-news-what-fruits-and-vegetables-should-be-eat-and-what-not-in-diabetes)

मधुमेहींनी आहारात करा 'या' फळ-भाज्यांचा समावेश

१. खरं तर मधुमेहींनी केळ खाऊ नये असं कायम म्हटलं जातं. परंतु, केळ्यामध्ये कार्बोडायड्रेट मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे मधुमेहींनी अर्ध केळं खाल्लं तरी चालतं.

२. दररोज अर्ध सफरचंद खावं. सफरचंदामध्ये अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी स्थिर राहते. तसंच पचनक्रियादेखील सुरळीत होते.

३. पेरुमध्ये व्हिटामिन ए, सी, डायटरी फायबर मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे मधुमेहींनी पेरु खावा. तसंच पेरुमध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाणही कमी असतं.

४. नासपती, अळू, जांभूळ ही फळेदेखील आवर्जुन खावीत. यात व्हिटामिन व डायटरी फायबर मोठ्या प्रमाणावर असतात ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

५. मधुमेहींनी आहारात आवर्जुन कारल्याचा समावेश करावा.

६. भेंडीमध्ये मायरिसिटीन असतं जे मधुमेहींसाठी उपयुक्त आहे.

हेही वाचा: Fact Check : कोंबडीमुळे म्युकोरमायकोसिसचा प्रसार?

मधुमेहींनी चुकूनही करु नका 'या' पदार्थांचं सेवन

१. द्राक्ष आणि चेरी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे मधुमेहींनी ही फळे खाऊ नये.

२. पिकलेला अननस अजिबात खाऊ नये. त्यात मोठ्या प्रमाणावर साखर असते.

३. एका पिकलेल्या आंब्यामध्ये जवळपास २५- ३० ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे आंबा खाऊ नये.

४. सुकामेवादेखील प्रमाणात खावा.

५. स्टार्च असलेल्या भाज्यांपासून दूर रहा.

६. बटाटे, भोपळा, बीट आणि मक्याचं कणिक यांचा आहारात समावेश करु नये.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image