तुमचा लाइफ पार्टनर वजन कमी करतोय? तर 'या' ४ सोप्या पद्धतीनं करा त्याला मदत

तुमचा लाइफ पार्टनर वजन कमी करतोय? तर 'या' ४ सोप्या पद्धतीनं करा त्याला मदत

मुंबई: वजन कमी करण्यासाठी केवळ वेळ खूप गरजेचं नाही आहे. त्यासोबतच रिलॅक्स माइंडसोबतच व्यायाम करणंही खूप महत्त्वाचं आहे. वजन कमी करताना तुम्ही काय खाल्लं पाहिजे? एका चांगल्या वर्कआऊटसाठी काय करायला पाहिजे? अशाच काही गोष्टी आहेत ज्यावर लक्ष दिल्यास तुम्हाला एक चांगला रिझल्ट मिळेल.  सध्या धावपळीच्या आयुष्यात काही कपल्स वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र त्यानंतर त्यांना त्याचा रिझल्ट दिसत नाही. 

बऱ्याचंदा महिला वर्ग घर आणि मुलं यांची जबाबदारी सांभाळत असतात. त्यामुळे महिलांना स्वतःवर लक्ष देता येत नाही. तर पुरुषांची मुख्य समस्या म्हणजे, त्यांच्या डोक्यावर कामाचं ओझं असतं. ज्यामुळे अर्धवट वर्कआऊट सोडून दुसरी काम करावी लागतात. 

मात्र, तुम्ही इच्छुक असल्यास या कठिण प्रवासात तुम्ही तुमच्या पार्टनरला मदत करु शकता. पार्टनरचं वजन कमी करण्यात आम्ही काय मदत करु शकतो? नक्कीच हा प्रश्न तुम्हांला पडला असेल. मात्र जेव्हा वजन कमी करण्याची गोष्ट येते. तेव्हा तुम्हाला तुमचा साथीदार किती समर्थन देतो. यावरही तुमचं यश अवंलबून असतं. 

वजन कमी करण्यासाठी तुम्ही खालीलप्रमाणे आपल्या पार्टनरला मदत करु शकता. 

मोटिवेट करा. 

जर तुमचा पार्टनर वजन कमी करण्यासाठी अथक प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्याला मोटिवेट करायला विसरु नका. याच्या मागे मुख्य कारण आहे की, वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या व्यक्तिला मनातून तयार करणं खूप गरजेचं आहे. त्यांना खात्री करुन द्या की, जर त्याने प्रामाणिकपणाने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला तर लवकरच तो फरक जाणवू लागेल. तसंच तुम्ही हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की, मोटिवेट करत असताना असं काही बोलू नका की त्यांना त्या गोष्टीचं वाईट वाटेल.

मोटिवेट करण्यासोबत इमोशनल सपोर्ट देखील महत्त्वाचा 

जर तुमचा पार्टनर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना इमोशनल सपोर्ट करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण बरेचदा त्यांना असं वाटतं असतं की, त्यांच्या प्रयत्नांचा काही उपयोग होणार नाही. 

हेल्दी खाण्यास मदत करा

आपल्या पार्टनरचं लवकर वजन कमी करायचे असेल तर तुम्हा स्वतःलाही काही प्रमाणात त्रास सहन करावा लागेल. हे तुम्हाला सांगण्या मागेही एक कारण आहे. तुमचा पार्टनर वजन कमी करत असताना बाहेरील खाद्य पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करावं लागेल. तुम्हीही आपल्या पार्टनरसोबत हेल्दी खाण्यास सुरुवात केल्यास केवळ त्यांनाच चांगलं वाटणार नाही. तर तुम्हीही स्वतः फिट राहण्यास मदत होईल. 

मूड स्विंग्सला सांभाळा 

वजन कमी करणं काही सोप्पं नाही आहे. वजन कमी करण्याच्या प्रवासात बऱ्याचंदा तुमच्या पार्टनरचा मूड स्विंग्स होत असतात. जसं की, छोट्या-छोट्या गोष्टींवर राग येणं, चिडचिड होत असते.  या वेळी आपल्याला धीर धरावा लागेल आणि त्यांची समजूत घालावी लागेल की वजन कमी करणं कठीण असलं तरी अशक्य नाही. तसंच त्यांना सांगावं लागेल की, तणाव किंवा राग यासारख्या गोष्टी तुम्ही केलेले कठोर परिश्रम खराब करण्याची शक्यता आहे.

health story Couple weight loss journey help to partner tips

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com