esakal | वारंवार थकवा जाणवत असेल, तर सावधान! 'या' आजारांचा करावा लागेल सामना
sakal

बोलून बातमी शोधा

वारंवार थकवा जाणवत असेल, तर सावधान!

डॉक्टर पुरेशी झोप, नियमीत व्यायाम, योग करण्याचा सल्ला देतात. मात्र असे अनेक लोक आहेत ज्यांना नेहमीच थकवा जाणवत राहतो.

वारंवार थकवा जाणवत असेल, तर सावधान!

sakal_logo
By
स्नेहल कदम

अलिकडे ऑफिशीअल कामाचे वाढलेले प्रमाण, कामामुळे आलेला ताण या गोष्टींमुळे थकवा येतो. साधारणत: फॅक्टरी किंवा अन्य कार्यालयीन काम करणाऱ्या लोकांना याचा अधिक त्रास जाणवतो. आजकाल धावपळीच्या वातावरणामुळे जीवनशैलीही बदलली असल्याचे आपण वाचतो. काही विषेश तज्ज्ञही आपल्याला याबाबतीत सांगत असतात. या कामाच्या व्यापामुळे आपण स्वत:च्याच आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे थकवा, आजारपण यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. याचा परिणाम कामावर आणि रोजच्या लाइफस्टाईलवरही होतो. यासाठी डॉक्टर पुरेशी झोप, नियमीत व्यायाम, योग करण्याचा सल्ला देतात. मात्र असे अनेक लोक आहेत ज्यांना नेहमीच थकवा जाणवत राहतो. अशा लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, कारण तुमचा हा थकवा एखाद्या आजाराचा संकेत असु शकतो.

अॅनिमिया -

नेहमीचा थकव्यामुळे तुम्हाला अॅनिमियाचा धोका असू शकतो. ज्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असते त्यांना ही समस्या सर्रास जाणवते. गर्भवती महिलांमध्ये ही समस्या उद्भण्याचे प्रमाण अधिक असते. वेळेत झोप न होणे, डोकं दुखणे, छातीत कळ येणे किंवा हृदय जोरात धडधडणे ही अॅनिमियाची लक्षणेही असू शकतात.

हेही वाचा: जेवणात नेहमीच असावी ज्वारीची भाकरी? जाणून घ्या फायदे

थायरॉडची समस्या -

शरारातील थकव्याचे प्रमाण वाढले असेल तर त्याचे मूळ कारण हे शरीरातील थायरॉइडचे प्रमाण वाढणे हे असू शकते. जेव्हा शरीरातील थायरॉइडचे संतुलन बिघडते तेव्हा थकावा वाढतो. ही समस्या गर्भवती महिलांना अधिक जाणवते. यामुळे या काळात महिलांना थकवा जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला जातो.

डायबिटीज -

अधिक थकवा येणे हे डायबिटीजचे लक्षण असू शकते. डायबिटीज ही कधीच कमी न येणारी आरोग्याची समस्या आहे. यासाठी तज्ज्ञ खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देतात. थकव्या शिवाय वारंवार भूक लागणे, तहान लागणे, वजन कमी होणे ही सुद्धा डायबिटीजच्या समस्येची मुख्य लक्षणे आहेत.

हेही वाचा: पाठदुखी : जाणून घ्या पाठ न सोडण्याचे कारण अन् उपाय

स्लीप एन्पिया -

ही एक अशी समस्या आहे, जी झोपताना श्वास घेताना अडचण निर्माण करते. कधी कधी यामुळे श्वास थांबण्याचे प्रकारही घडतात. खूप वेळ झोपल्यास तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही स्लीप एन्पियाची समस्येने ग्रासला आहात असे म्हणता येईल. या समस्येकडे दुर्लक्ष करु नये कारण यामुळे हाय ब्लड प्रेशर आणि स्ट्रोकचा धोका असू शकतो.

loading image
go to top