esakal | पाठदुखी : जाणून घ्या पाठ न सोडण्याचे कारण अन् उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

पाठदुखी : जाणून घ्या पाठ न सोडण्याचे कारण अन् उपाय

पाठदुखी : जाणून घ्या पाठ न सोडण्याचे कारण अन् उपाय

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : पाठीत भरून आले आहे. पाठ फारच दुखते आहे, या महिलांच्या आणि पुरुषांच्या नेहमीच्या तक्रारी. पडल्यामुळे, जोराचा धक्का बसल्याने किंवा अपघातात मार लागल्याने पाठीत वेदना होतात. अशावेळी तत्काळ मदतीची आवश्यकता असते. तसेच अति ताण पडेल अशा प्रकारे त्रास घेऊन खूपच जास्त वजन उचलले तरीही पाठीला फ्रॅक्चर होऊ शकते. नंतर त्याचे रूपांतर पाठदुखीत होते. तेव्हा पाठदुखी म्हणजे नेमके काय? ती कशामुळे होते आणि होऊ नये म्हणून तसेच झालीच तर काय करावे? याबाबत जाणून घेऊ या...

ताणामुळे आलेली पाठदुखी ही एकाच जागी, एकाच शारीरिक अवस्थेमध्ये खूप वेळ बसल्यामुळे किंवा ताण आल्यामुळे येते. उदाहरणार्थ एखाद्याला नोकरीच्या ठिकाणी दिवसभर खुर्चीत बसावे लागते. ते पाठदुखीचे कारण होऊ शकते. त्यात तुमची बसण्याची सवय, बसण्याच्या खुर्चीचा प्रकार आदी घटकांचा परिणाम होतो.

हेही वाचा: Success Story : प्रांजल देशातील पहिल्या नेत्रहीन महिला आयएएस

सततच्या पाठीवरच्या ताणामुळे माणसाचा मानसिक ताण सुद्धा वाढण्याची शक्यता असते. उलट प्रकारे बऱ्याचदा मानसिक ताणामुळेही पाठदुखी सुरू होते. जेव्हा पाठदुखी मानसिक ताणामुळे नसते, पूर्णपणे शारीरिक असते आणि भयंकर वेदना देणारी असते तेव्हा मात्र ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे आणि गरज लागल्यास हॉस्पिटलमध्ये अँडमिट होणे गरजेचे असते.

शरीरासोबत मनाचेही आरोग्य जपणे गरजेचे

पाठदुखीसाठी शारीरिक कारणांसोबतच मानसिक कारणेही जबाबदार असतात. मनावरील ताण, रोजच्या आयुष्यातील तणाव हेदेखील पाठदुखीला आमंत्रण देतात. मनाचा आणि पाठीचा काय संबंध, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मात्र, मनावरील ताणामुळे शरीराच्या सर्वच अवयवांवर परिणाम होतो, असे लक्षात आले आहे. कार्यालयातील कामाचा ताण, अस्वस्थता यामुळे पाठदुखी होत असेल तर शरीरासोबत मनाचेही आरोग्य जपणे गरजेचे आहे.

मीठ

तीन चमचे मीठ भाजून घ्या आणि एका कॉटनच्या कपड्यात ते मीठ बांधून त्याचा हळूहळू शेक घेतल्याने पाठ दुखणे कमी होते.

हेही वाचा: कांद्याचे आहेत विविध फायदे; जाणून घ्या लाभांविषयी

गरम पाणी

गरम पाणी करून त्यात एक टॉवेल भिजवा आणि पिळून तो टॉवेल दुखत असलेल्या भागावर ठेवा पाठदुखीचा त्रास कमी होईल.

गूळ आणि जिरा

एक कप पाण्यात गूळ आणि जिरा टाकून शिजवून तो काडा पिल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो.

चहा

चहात दोन काळी मिरी आणि थोडे आले टाकून चहा बनवा. हा चहा दररोज दिवसातून दोन वेळा पिल्याने पाठदुखीपासून तुमची सुटका होईल.

खोबरेल तेल

एक चमचा खोबरेल तेलात दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या टाकून, गरम करा आणि झोपताना त्या तेलाने पाठीचा मसाज करा

हेही वाचा: ‘लग्न कर किंवा तीन लाख दे’, स्क्रीन शॉट केले व्हायरल

ही घ्या काळजी

  • पाठीचा कणा सुस्थितीत राहण्यासाठी बसताना किंवा चालताना ताठ ठेवा

  • एकाच जागी जास्त वेळ बसणे टाळा

  • स्नायूंची हालचाल होण्यासाठी त्यांना आराम मिळवा म्हणून काम करताना विश्रांती घ्या

  • पाठीला आधार मिळेल अशाच खुर्चीवर बसा

  • झोपताना पाठीला आधार मिळेल अशा टणक पृष्ठभागावर झोपा

  • उंच टाचांच्या चपला, बूट वापरू नका

  • वजन नियंत्रणात राहण्यासाठी नियमित व्यायाम करा

loading image
go to top