Health Tips: धाप लागण्याची 5 कारणे, जाणून घ्या लक्षणं आणि उपचार

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 15 February 2021

अनेकांना धाप लागण्याची समस्या जाणवते.

Panting Symptoms Causes And Preventions: : अनेकांना धाप लागण्याची समस्या जाणवते. इंग्रजीत याला हाइपरवेंटिलेशन म्हटलं जातं. हार्ट फेलियर, फुफ्फुसाचे संक्रमण, श्वास कोंडणे अशा स्थितीत धाप लागण्याची परिस्थिती निर्माण होते. धाप लागणे काही आजार नाही, पण हे मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते. 

धाप लागण्याची कारणे

सीओपीडी

हा एक फुफ्फुसांसंबंधी साधारण आजार आहे. यात ब्रोंकाइटिसमध्ये श्वास घेण्याच्या नळीत सूज आणि छोठ्या हव्याच्या पिशव्या नष्ट होणे अशा समस्या निर्माण होतात. 

डोळ्यांमध्ये जळजळ होण्यापासून तर सूजन येणे सर्व समस्यांवर रामबाण उपाय, ट्राय...

अस्थमा

जोरजोरात श्वास घेणे अस्थमा अटॅकचे लक्षण असू शकते. श्वास घेण्याच्या नळीमध्ये सूज आल्याने व्यक्तीमध्ये श्वास घेण्यासंबंधी समस्या जाणवू शकतात. 

शरीरात पाण्याची कमतरता

शरीरात पाण्याच्या कमतरचा झाल्यास श्वास घेण्यात बदल जाणवू शकतो. शरीरातील कोशिकांमधील पाण्याच्या कमतरतेमुळे पुरेशी उर्जा मिळत नाही आणि निर्जलीकरण होऊन जोरजोरात श्वास घ्यावा लागू शकतो. 

रक्त साठणे

व्यक्तीमध्ये पल्मोनरी एंबॉलिज्मची समस्या असल्यास फुफ्फुसांमध्ये रक्त साठले जाते. यामुळे छातीमध्ये दुखणे, हृद्य जोरजोरात धडकणे आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो. 

संक्रमण-

फुफ्फुसांना संक्रमित करणारा रोग जसे की निमोनिया, व्यक्तीमध्ये श्वास घेण्यात अडचण निर्माण करु शकतो. खूप काळापर्यंत या समस्येशी झगडत असल्यास आणि उपचार केला नसल्यास फुफ्फुसांमध्ये तरल पदार्थ साठतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो. 

आता जिम जाण्याची गरजच नाही; घरच्या घरी हे ८ व्यायाम करा आणि राहा फिट 

धाप लागण्याची लक्षणं

- गळ्यात सूज आणि फुफ्फुसात जळजळ जाणवणे
-डोळ्यात पाणी येणे
-चक्कर येणे
-श्वास घेताना आवाज येणे
- हृदयाचे गती वाढणे

संरक्षण कसे कराल

- दारू आणि धुम्रपान पूर्णपणे टाळा
-कपालभाती, प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने श्वासासंबंधी समस्या दूर होई शकतात
-नियमीत व्यायाम केल्याने हायपरवेंटिलेशनच्या समस्येला रोखलं जाऊ शकतं
-पॅनिक अॅटक आल्यासारखं वाटत असल्यात त्वरित डॉक्टरांना भेटा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Tips Panting Symptoms Causes And Preventions