Health News : मानदुखी, कंबरदुखीची कोणती आहेत लक्षणे? यासाठी काय करावे लागेल? जाणून घ्या..

कंबरेला पुढच्या दिशेने (लंबर स्पाईन) आणि माकड हाडाच्या मागच्या दिशेने असलेल्या बाकाला (सेक्रल स्पाईन) असे म्हणतात.
Spine Disease
Spine Diseaseesakal
Summary

रुग्णांना प्रत्यक्ष तपासणे व निदान तपासणीचे अहवाल, रुग्णांच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेऊन उपचार केले जातात.

-नितीन चव्हाण Email ID : nitin२२२५५@gmail.com

मणक्यांमध्ये नैसर्गिकत: चार वेगवेगळे बाक असतात. मानेला पुढच्या दिशेने (सर्व्हायकल स्पाईन), पाठीला मागच्या दिशेने (Thoracic Spine), कंबरेला पुढच्या दिशेने (लंबर स्पाईन) आणि माकड हाडाच्या मागच्या दिशेने असलेल्या बाकाला (सेक्रल स्पाईन) असे म्हणतात. मणक्यांच्या मधून मज्जारज्जू जात असल्याने मणक्यांना इजा झाल्यास मज्जारज्जूवर परिणाम होऊन कंबरदुखी किंवा पाठीचे दुखणे, मणक्याचे आजार सुरू होतात.

Spine Disease
Computer Vision Syndrome : कॉम्प्युटरचे दृष्टिदोष टाळा अन् 20-20-20 चा नियम पाळा

मणक्याचा आजार होण्याची कारणे

लहान वयात खूप जास्त वजनदार दप्तराचे पाठीवर घेतलेले ओझे, खुर्चीत जास्तीत जास्त वेळ बसणे किंवा बसण्याची पद्धत चुकीची असणे, संगणकावर सतत काम करणे, कोणत्याही वाहनातून प्रवास करताना खड्ड्यांमुळे मणक्याला मार बसणे, व्यायामाचा अभाव, स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना (Spine Disease) येणारा ठिसूळपणा.

मणक्याच्या आजारांची लक्षणे

हाता-पायामध्ये मुंग्या येणे, कंप येणे, अवयव बधीर होणे, कंबरेत दुखणे, सकाळी उठताना त्रास होणे, कुशीवर वळताना त्रास होणे, पाठीच्या मणक्यातून कूस बदलताना कडकड आवाज येणे, कूस बदलताना पाठीचा मणका एकदम अवघडल्यासारखा होणे, चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे, कंबरेच्या मागील बाजूने पायाच्या तळव्यापर्यंत शीर दुखणे (सायटिका), मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे, पायाच्या पंजाची ताकद कमी होणे, पायातील स्पर्शज्ञान कमी होणे, शौचाला बसता न येणे, नसांवरील असह्य दबावामुळे लघवीचे नियंत्रण जाणे, असे काही भयप्रद परिणामही प्रसंगी दिसून येऊ शकतात.

Spine Disease
School Student : मुलांमधील दादागिरी व गुंड प्रवृत्ती कशी टाळावी; जाणून घ्या..

उपाय

पाठीच्या मणक्याच्या दुखण्यावर पेनकिलर आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्या हा काही यावरील इलाज नव्हे, हे वेळीच लक्षात घ्या. वेडेवाकडे बसणे टाळावे. सतत संगणकासमोर बसून काम असल्यास दर पाऊण ते एक तासाने ब्रेक घेऊन चक्क आळस दिल्याप्रमाणे हात वरच्या दिशेने ताणून स्नायू मोकळे करावेत. खुर्चीत बसताना आपली कंबर त्या खुर्ची वा सोफ्याच्या पाठीला टेकते आहे ना याकडे विशेष लक्ष द्यावे. नसल्यास पाठीमागे एखादी पातळ उशी घेऊन बसण्यास सुरुवात करावी. पाठदुखीबरोबरच अत्यंत सामान्यपणे आढळणारा त्रास म्हणजे मानेचे दुखणे. दर तीन लोकांमध्ये एका व्यक्तीला मानेच्या दुखण्याचा त्रास आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. बऱ्‍याचवेळा मानदुखी तात्पुरत्या औषधोपचाराने थांबते; पण, काहीवेळा कालांतराने पुनश्च उद्‍भवू शकते. त्यानुसार मानदुखीचे दोन प्रकार आहेत.

तात्पुरत्या स्वरूपात मान दुखणे (अ‍ॅक्युट नेकपेन) - कॉम्प्युटर अथवा मोबाईलवर दीर्घकाळ काम करत असल्यास झोपेतील स्थितीमुळे, खेळताना, थंडीच्या वातावरणाचा परिणाम म्हणून काहीवेळा मानेमध्ये वेदना होणे, स्नायू आखडल्याप्रमाणे वाटणे अशा स्वरूपाच्या लक्षणांची मानदुखी असते. साधारणत: एक ते दोन आठवड्यांच्या औषधोपचाराने ही मानदुखी थांबते.

Spine Disease
Infertility Symptoms : जोडप्यांमधील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वंध्यत्व; कोणती आहेत कारणे?

दीर्घकालीन मानदुखी (क्रॉनिक नेकपेन) ः मानेमधील दुखणे तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ असेल तर त्याला क्रोनिक नेकपेन असे म्हणतात. मानसिक ताणतणाव, कामामुळे अथवा काहीवेळा खेळताना अशा स्वरूपाच्या वेदना पुन्‍हा सुरू होतात. बऱ्‍याचवेळा यासाठी काही काळजी करण्याचे कारण नसते; पण काहीवेळा काही लक्षणे तशीच असतात की, त्यामुळे संभाव्य धोके हे अधिक घातक परिणाम करू शकतात.

ऑकझियल पेन ः मुख्यत: मानेच्या मणक्यांच्या ठिकाणी असणाऱ्या वेदना या मानेच्या मागील बाजूस व खांद्यापर्यंत पसरतात.

रॅडिक्युलर पेन ः यामध्ये मानेच्या मणक्यांच्यामध्‍ये असणारा चकतीसारखा गादीचा भाग हा मानेच्या मणक्यांमधून जाणाऱ्‍या मज्जारज्जूंवरील शिरांवर पडतो. त्यामुळे मुख्यत: हातांमध्ये वेदना पसरणे, यामध्ये काहीवेळा हातांच्या स्नायूंमध्ये ताकद कमी होणे, कार्यक्षमता कमी होणे, मुंग्या येणे यांसारखी लक्षणे जाणवतात.

मानदुखी हे लक्षण सामान्य असले तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. मुख्यत: वरीलप्रमाणे अथवा पुढील लक्षणे असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. मानेमध्ये वेदना होणे किंवा मान जखडणे. मलमूत्रांवरील विसर्जन प्रक्रियेचे नियंत्रण कमी होणे. मानदुखीबरोबरच डोके दुखणे, मळमळ, उलटी होणे, अंधारी येणे, उजेड नकोसा वाटणे. आरामाच्या वेळीही मानेमध्ये सतत वेदना होणे. हातापायांमधील स्नायूंची ताकद कमी होणे, मुंग्या येणे, हातांची बोटे जड वाटणे, हात उलटताना त्रास होणे, वस्तू न पकडता येणे, डॉक्टर परीक्षण करून स्नायूंची ताकद, स्थिती यांचा अंदाज घेऊन क्ष-किरण तपासणी, सिटीस्कॅन अथवा एमआरआय तपासणीद्वारे निदान करतात.

Spine Disease
Childrens Health : मुलांनी खोटं बोलणं टाळावं यासाठी काय करावं?

रुग्णांना प्रत्यक्ष तपासणे व निदान तपासणीचे अहवाल, रुग्णांच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेऊन उपचार केले जातात. फिजिओथेरपी, औषधोपचार, मानेखाली घ्यावयाची उशी यांसारख्या किरकोळ उपचारांनी बहुतांशवेळा आराम मिळतो. काहीवेळा ट्रॅक्शन देणे, थंड अथवा गरम पिशवीने शेक देणे, आयएफटी, मॅट्रिक्स थेरपी यांसारखे उपचार केल्याने हा त्रास आटोक्यात येऊ शकतो. मानदुखी, पाठदुखी, तसेच कंबरदुखी सर्व वयोगटांतील व्यक्तींना केव्हा न केव्हातरी होते. शारीरिक स्वास्थ्य, बसण्याच्या/झोपण्याच्या योग्य पद्धती, समतोल आहार, नियमित व्यायाम आणि काही त्रास उद्‍भवल्यास तज्ज्ञांकडून तपासणी आणि उपचार करून घेतल्यास आपले जीवन निरोगी व सुखी राहण्यास मदत होते.

(डॉ. चिरायु हॉस्पिटल, रत्नागिरी, येथे अस्थिरोगतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com