Childrens Health : मुलांनी खोटं बोलणं टाळावं यासाठी काय करावं?

काही हुशार मुलं (Smart kids) स्वप्न विश्वात रमणारी असतात व सत्य आणि स्वप्न याची गफलत करू शकतात.
Why do children lie?
Why do children lie?esakal
Summary

चार वर्षांखालील मुलांना खरं-खोटं याचे ज्ञान नसते. काही हुशार मुलं (Smart kids) स्वप्न विश्वात रमणारी असतात व सत्य आणि स्वप्न याची गफलत करू शकतात.

-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण sajagclinic@gmail.com

मीनलची आई सांगत होती की, मीनल शाळेत घरच्या परिस्थितीबद्दल मुलांशी, शिक्षकांशी (Teacher) खोटं बोलते आणि सहानुभूती मिळवते. चांगल्या सुसंस्कृत घरातील मुलीकडून हे वागणे विस्मयकारक होते.

मुलं खोटं का बोलतात? : चार वर्षांखालील मुलांना खरं-खोटं याचे ज्ञान नसते. काही हुशार मुलं (Smart kids) स्वप्न विश्वात रमणारी असतात व सत्य आणि स्वप्न याची गफलत करू शकतात. कधी कधी मुलं घाबरल्यामुळे एखादी चुकीची गोष्ट लपवण्यासाठी किंवा शिक्षा (Punishment) टाळण्यासाठी खोटं बोलू शकतात. क्वचित मुलाला उदास वाटत असल्यास ते खोटं बोलते तर कधी मुलं इतर मुलांवर रुबाब झाडण्यासाठी खोटे बोलतात.

Why do children lie?
Health News : मुलांमधील स्थूलतेचा वाढता प्रकोप; कोणती आहेत कारणे, कशी घ्याल काळजी?

मुलांनी खोटं बोलणे टाळावे म्हणून हे करावे

 • १) पालकांनी स्वतः चांगले उदाहरण बनावे. स्वतः प्रामाणिकपणे वागावे, खोटे बोलू नये व कोणी तसे वागले तर त्या वागण्याचा निषेध करावा.

 • २) मूल खोटे बोलल्यास आपली नापसंती दर्शवावी. मुलाला हिणवू नये, प्रेमाने समजवावे.

 • ३) मूल खूप उदास, दुःखी असल्यास त्याच्या दुःखाचे कारण समजून त्याचे निरसन करावे. गरज वाटल्यास शाळेतील शिक्षकांशी, मुलाच्या मित्रांशी बोलावे व त्यांची मदत घ्यावी.

मुले चोरी का करतात?

पाच वर्षांखालील मुलांमध्ये मालकी हक्क ज्ञान नसते. त्यांना कळत नसते की, दुसऱ्याची गोष्ट घेऊ नये. चोरी ही संकल्पना त्यांना समजत नसते. असे असले तरी पालकांनी तसे घडल्यास मुलांना समजवावे की, असे करणे चुकीचे आहे. मुलांना शिक्षा करण्यापेक्षा प्रेमाने समजवावे. सहा ते आठ वर्षांच्या मुलामध्ये मालकी हक्क क्वचित सुस्पष्ट नसते. मुलाने दुसऱ्या मुलाची वस्तू घेणे असे घडू शकते. असे घडल्यास पालकांनी नाराजी दर्शवावी व योग्य वागणे समजावून सांगावे. ८ वर्षानंतर जर एखादी चोरीची घटना घडल्यास मूल आपण काय केल्यास शिक्षा होते हे तपासत असू शकते; परंतु पुन्हा पुन्हा जर मूल चोरी करायला लागले तर काळजीचे कारण आहे, असे समजावे.

सर्वसाधारण बुद्धीच्या आठ वर्षांच्या मुलाला माहीत असते की, दुसऱ्याची मालमत्ता लंपास करणे म्हणजे चोरी आहे. कधी कधी चंचल मूल कळत असूनही दुसऱ्याची वस्तू उचलण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. कधी कधी मूल भुकेले असेल व घरात पुरेसे अन्न नसल्यास ते चोरी करू शकते. मूल जर अभावात वाढत असेल तर त्याला इतर मुलांकडे असणाऱ्या सुंदर गोष्टीची हाव वाटू शकते जसे की बूट, मोबाईल, व्हिडिओ गेम. मूल उदास असले तर कधी ते घरातील, दुकानातील किंवा इतर मुलांकडील वस्तू घेऊन आनंद मिळवू पाहत असू शकते. क्वचित मुलाकडे आई-वडिलांचे लक्ष नसल्यास नकारात्मक का होईना लक्ष वेधून घेण्यासाठी मूल चोरी करू शकते. स्वतःला इतरांसमोर निडर सिद्ध करण्यासाठी कधी मुले चोरी करू शकतात.

Why do children lie?
Computer Vision Syndrome : कॉम्प्युटरचे दृष्टिदोष टाळा अन् 20-20-20 चा नियम पाळा

चोरी करणाऱ्या मुलांची पार्श्वभूमी कशी असते?

 • १) भौतिक किंवा भावनिक अभावात जगणारी मुलं, गरिबीमध्ये जगणारी मुले, मायेसाठी, प्रेमासाठी आसुसलेली मुलं चोरी करतात, असे दिसून येते.

 • २) पालकांकडून पुरेसे लक्ष जर दिले गेले नाही तर असे दुर्लक्षित मूल चोरी करू शकते.

 • ३) घरातील मोठे जर गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्यास ते मुलांसाठी चुकीचे उदाहरण बनू शकतात.

 • ४) शैक्षणिक गुणवत्ता ज्या मुलांची कमी असते ते चोरीसारखे गैरवर्तन करू शकतात.

 • ५) चंचल मुलांमध्ये चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून येते.

चोरी करणाऱ्या मुलाला मदत कशी करावी?

 • १) पालकांना अथवा शिक्षकांना चोरी झाली समजल्यास लगेच न्यायनिवाडा करू नये, टीकास्त्र सोडू नये.

 • २) त्यांच्या भावंडांमधील वागणे तसेच शाळेत मुलांबरोबर व शिक्षकांबरोबरचे वागणे तपासून बघावे.

 • ३) कुठल्या परिस्थितीत चोरी केली गेली? कारणांमध्ये अभाव आहे का, ते बघावे

 • ४)चोरी करण्यास कधी सुरवात झाली, कितीवेळा चोरी केली गेली?

 • ५) मूल चंचल आहे का, मूल शाळा बुडवतंय का, मुलाची बुद्धिमत्ता कशी आहे?

 • ६) मुलाला चोरी करण्याबद्दल काय वाटते, लाज वाटते का? अपराधीपणा वाटतो का? या सर्व बाबी समजून घेणे हे गरजेचे असते.

Why do children lie?
School Student : मुलांमधील दादागिरी व गुंड प्रवृत्ती कशी टाळावी; जाणून घ्या..

चोरी रोखण्यासाठी पालकांनी, शिक्षकांनी तसेच पोलिसांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत. मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने समस्या समजून घेण्यास, पालकांना आधार देऊन समस्येला योग्यरित्या सोडवण्यास मदत होईल तसेच मुलाला भावनिक समस्या असल्यास त्याचे निदान करून त्यावर योग्य ते उपचार करता येतील. परिवार खूप गरीब असल्यास आर्थिक समस्येमुळे चोरी होत असल्यास परिवाराला आर्थिक नियोजनाबद्दल सल्ला आवश्यक असतो.

पालकांनी मुलांना कसे समजवावे -

 • १) मुलांना स्पष्ट निर्देश द्यावा की, चोरी करणे चुकीची आहे व पालकांना त्यांचे चोरी करणे नापसंत आहे. चोरी केल्याने होणारे गंभीर परिणाम मुलांना प्रेमाने समजवावे.

 • २) मुलांनी चोरी केली असल्याचे नक्की असल्यास मुलाला कबूल करण्यास दबाव टाकू नये. शक्यता आहे मूल चूक लपवण्यासाठी खोटं बोलू शकते.

 • ३) मुलांना वेळोवेळी स्पर्शातून, वागण्यातून प्रेम जाणवू देणे, तसेच भावंडांबरोबर, आई-वडिलांबरोबर जास्त वेळ मिळेल याची काळजी घ्यावी.

 • ४) पालकांनी पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवावे जेणेकरून मुलाला प्रलोभनापासून रोखता येईल.

 • ५) शाळेशी संपर्क करून मुलाला शाळेत मित्र बनवण्यास मदत करावी जेणेकरून त्याला पैसे देऊन मैत्री विकत घेण्याची गरज भासणार नाही.

Why do children lie?
Infertility Symptoms : जोडप्यांमधील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वंध्यत्व; कोणती आहेत कारणे?
 • ६) चांगले वागल्यास बक्षीस द्यावे व हे बक्षीस वस्तू असण्याची गरज नाही. मुलाला शाबासकीची थाप, मिठी मारणे कौतुक पुरेसे ठरते.

 • ७) शक्य असल्यास मुलाला थोडे पॉकेटमनी द्यावे जेणेकरून मुलाला थोडे पैसे त्याला हवे तसे खर्च करता येतील.

 • ८) चोरीसोबत जर इतर असामाजिक वर्तन असल्यास पोलिसांची, शाळेची मदत घ्यावी.

 • ९) मुले अभ्यासात गतिमंद असल्यास शिक्षकांसोबत संपर्क करून मुलाला योग्य मदत मिळेल हे बघावे.

 • मीनलच्या परिवाराचे समुपदेशन केल्यावर तिच्या आणि पालकांमधील बॉण्डिंग सुधारले आणि तिचे खोटे बोलणे थांबले.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com