'व्हिटॅमीन डी'च्या कमतरतेमुळे कोरोनाने घेतले सर्वाधिक मृत्यू, वाचा काय आहे उपाय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

प्रतिकार शक्ती चांगली असेल तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो. याबाबत अनेक प्रकारची माहिती शेअर केली जात आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसनं जगभर हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जगात जवळपास 4 लाख 55 हजार 231 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगातील एकूण 85 लाख 6 हजार 107 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या साथीच्या रोगामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जगातील अनेक देश प्रयत्न करत असून सध्या तरी सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव उपाय आहे.

Lockdown मध्ये बिघडलं झोपेचं गणित? अशी सोडवा समस्या

लोकांमध्ये प्रतिकार शक्ती वाढवण्याबाबत जनजागृती केली जात आहे. प्रतिकार शक्ती चांगली असेल तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो. याबाबत अनेक प्रकारची माहिती शेअर केली जात आहे. नुकतंच डेली मेलने एक अभ्यास प्रकाशित केला. यानुसार कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या लोकांपैकी 99 टक्के लोक ते आहेत ज्यांच्या शरीरात व्हिटॅमीन डी ची कमतरता होती. यातून हेच समोर येते की सुर्याची किरणे कोरोनाच्या संकटात आपली सुरक्षा करू शकतात. 

Smile Please! चेहऱ्यावरचं गोड हसू आरोग्यासाठी लाभदायक

केंब्रिजमध्ये अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनात असं आढळून आलं की व्हिटॅमीन डीची कमतरता असलेल्या युरोपीय देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या मुद्द्यावर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सीलेन्सवर रॅपिड इव्हिडन्स रिव्ह्यू आयोजित करण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत याचे प्रकाशन सुरु होण्याची आशा आहे. इंडोनेशियाचा अभ्यास हा कोणत्याही विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून नव्हता. Prabowo Raharusuna सह 5 संशोधकांना स्वतंत्रपणे निव़डण्यात आलं होतं. तसंच त्यांच्या वैज्ञानिक पार्श्वभूमीची कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. 

नैराश्यावर मात कशी करायची? वाचा आनंदी राहण्याचे सोपे उपाय

संशोधन एप्रिलमध्ये प्रकासित झालं. सध्या सहकारी वैज्ञानिकांकडून त्याची समीक्षा होणार आहे. या प्रक्रियेतून संशोधनातील त्रुटी समोर येतील. दरम्यान, संशोधनामध्ये असं आढळून आलं की, व्हिटॅमीन डी ची कमतरता असलेल्या रुग्णांचे वय, लिंग आणि त्यांच्या सोबतच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 10 पट जास्त होतं. 5 पैकी 1 ब्रिटीश वृद्ध आणि 6 पैकी एका मुलामध्ये व्हिटॅमीन डी ची कमतरता आहे. याचे कारण खराब जेवण, जास्त वेळ घराच्या आतच राहणं आणि कमी सुर्य प्रकाशात राहणे हे आहे.

हे वाचा - नैराश्य तुम्हालाही असू शकतं; जाणून घ्या प्राथमिक लक्षणं

तज्ज्ञांच्या मते जगभरात जवळपास 1 बिलियन लोकांमध्ये व्हिटॅमीन डीची कमतरता असू शकते. आकडेवारी पाहता जागतिक सार्वजनिक आरोग्याच हा मुद्दा आहे. अनेक वैज्ञानिकांना ही भीतीसुद्धा आहे की लॉकडाऊनमुळे घरात राहिल्यानं त्यांच्यात कमतरता निर्माण झाली आहे.

 हे वाचा - पावसाळा आलाय डोळ्यांची 'अशी' घ्या काळजी

माणूस जेव्हा सूर्याच्या प्रकाशात जातो तेव्हा शरीरात व्हिटॅमीन डीची निर्मीती होते. तसंच मासे खाल्ल्यानेही शरीरात व्हिटॅमीन डीचे प्रमाण वाढते. गाईचं दूध, दही, संत्री, डाळ, मशरूम, अंडी यांच्या सेवनाने शरीराती व्हिटॅमीन डीची कमतरता भरून काढता येते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health vitamin d impact in body of covid 19 patient what to do