esakal | High BP आहे? ही पाच फळे खाल्ल्याने मिळेल आराम! 5 Fruits Helps To Control Your High BP
sakal

बोलून बातमी शोधा

High BP

High BP आहे? ही पाच फळे खाल्ल्याने मिळेल आराम!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

उच्च रक्तदाब अर्थात हाय ब्लड प्रेशर ही आजच्या काळात लोकांमध्ये झपाट्याने वाढणारी समस्या आहे. या समस्येने ग्रस्त लोकांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयावर जास्त ताण पडतो. जास्त तळलेले अन्न, स्निग्ध पदार्थ खाणे आणि शारीरिक मेहनत न केल्यामुळे ही समस्या निर्माण होते. जर तुम्ही सुद्धा या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्या आहारात या ५ फळांचा समावेश करायला विसरू नका.

आहारतज्ञ आणि वेलनेस तज्ज्ञ वरुण कत्याल यांच्या मते, स्ट्रॉबेरीमध्ये अँथोसायनिन नावाचे अँटीऑक्सिडेंट संयुग असते, जे एक प्रकारचे फ्लेव्होनॉइडचे आहे. एका अभ्यासात संशोधकांना असे आढळले की. अँथोसायनिनचे (जे स्ट्रॉबेरीसारख्या फळातून मिळते) जास्त प्रमाणात सेवन करणाऱ्यांमध्ये कमी अँथोसायनिनचे सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत उच्च रक्तदाब होण्याचा धोका कमी असतो.

हेही वाचा: मनुकांमध्ये असतात औषधी गुण; हे आहेत फायदे आणि नुकसान

fruits

fruits

१) किवी- किवी हे रक्तदाबाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर फळ आहे. ते रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. किवीमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम उच्च रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत करतात. किवीचे सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका, स्ट्रोकचा धोका कमी होतो. बीपीच्या रुग्णांनी दररोज किवीच्या रसाचे सेवन करावे.

२) टरबूज- टरबूजमध्ये असलेले अ‍ॅमिनो अ‍ॅसिड, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लाइकोपीन सारखे घटक उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त, टरबूजामध्ये असलेले पोटॅशियम व्यायामादरम्यान रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

३) आंबा- फळांचा राजा आंबा खाण्यास चवदार असतोच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतो. आंब्यामध्ये असलेले फायबर आणि बीटा कॅरोटीन रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

४) स्ट्रॉबेरी- स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असतात. त्यामध्ये असलेले पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

5-केळी- पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्वाची भूमिका बजावते. केळी पोटॅशियम, ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत.

loading image
go to top