esakal | असहनीय 'सायनस' वर हे आहेत घरघुती उपाय; मिळेल आराम

बोलून बातमी शोधा

Sakal - 2021-02-27T154930.136.jpg}

सायनसमध्ये जराशीही सर्दी, खोकला, ताप मोठी समस्या बनते. सायनसचे अनेक रुग्ण सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, सूज येणं अशा दुखण्याने त्रस्त असतात. वातावरणातील बदल किंवा वाढतं प्रदुषण यांमुळे अनेक लोकांना सायनसची समस्या उद्भवते. जाणून घेऊयात असे काही घरगुती उपाय

असहनीय 'सायनस' वर हे आहेत घरघुती उपाय; मिळेल आराम
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सायनस म्हणजे शरीराला झालेलं एक प्रकारचं इन्फेक्शनच असतं. सायनसमुळे नाकाचं हाड, गाल आणि डोळेही दुखू लागतात. साइनसाइटस किंवा सायनसचं दुखणं अनेकदा असहनीय असतं. सायनसमध्ये जराशीही सर्दी, खोकला, ताप मोठी समस्या बनते. सायनसचे अनेक रुग्ण सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, सूज येणं अशा दुखण्याने त्रस्त असतात. वातावरणातील बदल किंवा वाढतं प्रदुषण यांमुळे अनेक लोकांना सायनसची समस्या उद्भवते. जाणून घेऊयात असे काही घरगुती उपाय ज्यामुळे सायनसच्या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हाला मदत होईल. अॅलर्जी किंवा थंडीमुळे सायनसमध्ये सूज येते आणि यामुळे रुग्णाला डोकेदुखी, शरीराच्या अनेक भागात अतिशय वेदना होतात. या दुखण्यापासून सुटका होण्यासाठी अनेक रुग्ण काही औषधंही घेतात. पण काही घरगुती उपायांनी सायनसच्या दुखण्यापासून काहीसा आराम मिळू शकतो. 


हायड्रेटेड राहा
सायनसच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी वेळोवेळी गरम पाणी, फळांचे ज्यूस, नारळ पाण्याचं सेवन करावं. त्यामुळे शरीर डिहायड्रेटेड होण्यापासून बचाव होईल. शरीर हायड्रेटेड राहिल्यास सायनसची समस्याही कमी होण्यास मदत होईल.

तणावमुक्त राहा
सायनसची समस्या असल्यास कोणत्याही परिस्थितीत अधिक ताण घेऊ नका. मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करा. डिप्रेशनची समस्या असल्यास मानोसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या. सोबतचं योगा करणं फायदेशीर ठरेल. यामुळे मानसिक शांती मिळाल्यास सायनसची समस्याही दूर होण्यास मदत होईल.

वाफ घेणे
सायनसच्या समस्येवर मिठाच्या पाण्याची वाफ घेणं फायदेशीर ठरतं. यामुळे बंद नाक मोकळं होते आणि सायनसच्या दुखण्यापासूनही काही प्रमाणात आराम पडतो. दिवसांतून दोन ते तीन वेळा हा उपाय करता येऊ शकतो. यामुळे नाकात आणि गळ्यामध्ये जमलेली धूळ आणि मातीचे कण साफ होऊन जातात. गरम पाण्याची वाफ घेताना त्यामध्ये निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाकणं फायदेशीर ठरतं

अॅप्पल साइड व्हिनेगर
अॅप्पल साइड व्हिनेगर सायनसवर फायदेशीर ठरतं. अॅप्पल साइड व्हिनेगर इन्फेक्शनपासून बचाव करतं. सायनसची समस्या उद्भवल्यास, २ चमचे अॅप्पल साइड व्हिनेगरमध्ये १ चमचा मध मिसळून पिण्याने सायनसपासून बचाव होतो.

हे पदार्थ टाळा
सायनसचा त्रास होत असेल तर नेहमी थोड्याशा शिजवलेल्या भाज्यांचं सूप , सफरचंद, डाळी आणि भाज्यांचं सेवन करा. याव्यतिरिक्त कफ तयार होण्यास मदत करणारे पदार्थ म्हणजे, चॉकलेट, अंडं, साखर आणि मैदा यांसारख्या पदार्थांचं सेवन करणं टाळा. तसेच जास्त तेलकट पदार्थांचं सेवन केल्यामुळेही सायनसचा त्रास होऊ शकतो. यावर भरपूरप्रमाणात पाणी पिणं फायदेशीर ठरतं.

हळद 
हळदीनेही सायनसमध्ये आराम पडतो. हळदीत पुरेशा प्रमाणात अॅन्टी-इंफ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे सायनस इन्फेक्शन कमी होतं. खाण्यापासून ते गरम पाण्यातूनही हळद टाकून घेतल्यास फायदा होतो.

कांदा आणि लसणाचं सेवन करणं फायदेशीर
सायनसवर कांदा आणि लसणाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर असतं. जे सर्दी , खोकला आणि सायनसच्या इन्फेक्शनवर गुणकारी ठरतं. तसेच कांद्याचा दर्प सायनसवर लाभदायक ठरतो.  त्यासाठी कांदा आणि लसून पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याची वाफ घ्या. असं केल्यामुळे तुम्हाला सायनसच्या त्रासापासून आराम मिळेल. 

नाकावर मसाज

मेथीचे काही दाणे गरम पाण्यामध्ये उकळून प्यायल्याने सायनसचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. जर सायनसचा जास्त त्रास होत असेल तर दररोज ऑलिव्ह ऑईलने नाकावर मसाज करा. सायनसमुळे होणारा त्रास दूर होईल.