Special Report : जाणून घ्या माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कशी लढते नॉवेल कोरोना व्हायरसशी

Special Report :  जाणून घ्या  माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कशी लढते नॉवेल कोरोना व्हायरसशी

ऑस्ट्रेलियात वैज्ञानिकांनी दावा केलाय की त्यांनी मानवाची रोग प्रतिकारक क्षमता नॉवेल कोरोना व्हायरसचा कसा सामना करते याची माहिती मिळवली आहे. नेचर मेडिसिन जरनलमध्ये हा शोध प्रकाशित करण्यात आलाय. जगभरात कोरोनाचा फैलाव झालाय. विविध देशांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, कोरोनाची लागण झाल्यावर मानवी शरीर यावर कसं रिऍक्ट करतं याबद्दल माहिती देण्यात आली आहे. या शोधतील मुख्य हेतू हा शरीरातील 'त्या' पेशिंबद्दल माहिती मिळवणं आहे 'ज्या' कोरोना विषाणूशी सामना करतात. अशा प्रकारचा अभ्यास केल्याने संशोधकांना COVID19 वर लस बनवण्यासाठी मदत मिळेल असं या वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.   

चीनमधील वुहान शहरातून नॉवेल कोरोना व्हायरसचं संक्रमण झालं. यानंतर हा व्हायरस मानावातून मानवाला संक्रमित होत गेला. अशात आता जगभरातील १९९ देशांमध्ये कोविड-१९ चे रुग्ण आढळून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या माहितीनुसार जगभरात ४६५९१५ लोकांना कोविड १९ चा चा संसर्ग झालाय. या रोगामुळे २१०३१ नागरिकांचा मृत्यू झालाय. (सदर माहिती दिनांक २७ मार्च २०२०, संध्याकाळी ५.०० वाजे पर्यंतची आहे)   

कोरोना व्हायरस शरीरावर काय परिणाम करतो, आपलं शरीर कोरोनाच्या विषाणूंशी कसं फाईट करतो हे वैज्ञानिक पहिल्यांदाच शोधून काढतायत. म्हणूनच हे संशोधन अत्यंत महत्त्वाचं असल्याचं या संशोधनात सामील असलेल्या प्रोफेसर कॅथरीन यांचं म्हणणं आहे. मेलबर्नमधील पीटर डोहर्टी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शन अँड इम्युनिटी या संस्थेच्या कामाचं जगभरातील वैज्ञानिकांनी स्वागत केलंय. एका वैज्ञानिकाने हा मोठा शोध असल्याचं म्हटलंय. 

एकीकडे कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढतोय, तर दुसरीकडे अनेकांनी कोरोनावर मात देखील केलीये. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार कोरोनाचा संसर्ग झालेल्या अनेकांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र आता आपापल्या घरी परातलेत. याचाच अर्थ मानवी शरीराला या विषाणूशी लढता येतंय हाच होतो. अभ्यासकांच्या मते या रिसर्च मधून ४ वेगवेगळ्या प्रकारच्या रोगप्रतिकारक पेशींची माहिती समोर आलीये. या पेशी कोविड १९ सोबत लढण्यास सक्षम मानल्या जात आहेत. एका मध्यम स्वरूपाची कोरोना पॉझिटिव्ह लक्षणं असणाऱ्या महिलेच्या रोगप्रतिकारक पेशींचा अभ्यास करून सदर माहिती गोळा करण्यात आली आहे. 

चीनमधील वूहान शहरातील एका महिलेला कोरोना संक्रमण झाल्यानंतर तिला ऑस्ट्रेलियात भरती करण्यात आलं होतं. भरती केल्याच्या १४ दिवसानंतर ही महिला पूर्णपणे धडधाकट होऊन घरी गेली. प्रोफेसर कॅथरीन यांनी BBC ला याबद्दल माहिती दिलीये. हा रिसर्च करत असताताना सदर महिलेच्या रोग प्रतिकारक शक्तीला केंद्रस्थानी ठेवण्यात आलंय. 

या रिसर्चमधून एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली, ज्यामध्ये महिला बरी होण्याच्या ३ दिवस आधी या महिलेलच्या रक्ताभिसरणात काही विशिष्ट प्रकारच्या पेशी आढळल्यात. या पेशी तापाच्या रुग्णांमध्ये बरं होण्याआधी दिसणाऱ्या पेशींसारख्या आढळल्याचं या रिसर्च मधून समोर आलंय. ऑस्ट्रेलियातील आरोग्य मंत्री ग्रेह हंट यांच्या म्हणण्यानुसार हे संशोधन कोरोनावरील लस बनवण्याच्या दिशेनं नेणारं मोठं पाऊल आहे. 

आता अभ्यासक ज्यांच्यात कोरोनाचा संसर्ग जास्त होता अशा लोकांमध्ये त्यांची रोगप्रतिकारक शक्ती का कमी पडली यावर संशोधन करतायत. जेणेकरून या रोगावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवता येईल.

how immune system of humans fights with novel corona virus read full report

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com