तोंडातून सतत येते दुर्गंधी? हे उपाय करा आणि रहा फ्रेश.. वाचा सविस्तर 

अथर्व महांकाळ
Saturday, 29 August 2020

दुर्गंधीची समस्या दूर करण्यासाठी काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा काही विशेष खाद्य पदार्थांच्या खाल्ल्यामुळे किंवा काही आजार असल्यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. याही काही अजूनही कारणे आहेत. 

नागपूर :  आपण कुठल्या समारंभाला जातो किंवा कार्यक्रमांना जातो त्यावेळी अनेकदा लोकं आपल्याजवळ येण्यास किंवा बोलण्यास तयार नसतात. याचं  प्रमुख कारण तुमच्या तोंडाची दुर्गंधी हे असू शकतं. काही खाल्ल्यामुळे किंवा जेवणानंतर तोंड आतून स्वच्छ न केल्यामुळे तोंडातून दुर्गंधी येते. जर एखादी व्यक्ती आपल्याला ती गोष्ट उघडपणे सांगते तर ते आपल्यासाठी फारच लज्जास्पद वाटते. पण आता चिंता करू नका आम्ही तुम्हाला तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत. 

दुर्गंधीची समस्या दूर करण्यासाठी काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा काही विशेष खाद्य पदार्थांच्या खाल्ल्यामुळे किंवा काही आजार असल्यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. याही काही अजूनही कारणे आहेत. 

जाणून घ्या - रोजगार मिळावा म्हणून विकली वडिलोपार्जित शेती.. पण पैसे देताच बाहेर आले धक्कादायक सत्य; नक्की काय घडले

काय आहेत दुर्गंधी येण्याची कारणे -

 • जास्त मसालेदार जेवण, कांदा, लसूण, अदरक, लवंग, काळी मिरीच्या अति सेवनामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. 
 • हिरड्यांचे आजार, शरीरामध्ये झिंकच्या कमतरतेमुळे किंवा मधुमेहामुळे तोंडातून वास येऊ शकतो. 
 • जर आपण बराच काळ काहीही न खाता-पिता राहिलो तर आपल्या तोंडातून दुर्गंधी येऊ शकते.
 • तोंडाला कोरड पडल्यामुळे जिवाणू वाढीस येतात त्यामुळे वास येतो. 
 • पचन व्यवस्थित नसल्यामुळे आणि पोट खराब असल्यामुळे देखील तोंडातून वास येऊ शकते. 
 • तंबाखू खाणारे आणि सिगरेट ओढणाऱ्या लोकांना तोंडाच्या दुर्गंधीचा सामना करण्याची वेळ येते. यामध्ये आपल्या तोंडातील लाळ बाहेर फेकली जाते, ज्याने तोंड कोरडे पडून दुर्गंधी येते

Video - एक गाव दगडांचे.. येथे खडकातच मानवी जीवन; जाणून घ्या एका अनोख्या गावाची कहाणी

अशी घालवा तोंडाची दुर्गंधी- . 

 • जेवणात कच्चा कांदा लसूण आणि मसाल्याच्या पदार्थांचा वापर कमी करावा आणि जेव्हा कराल त्यावेळी गुळणा करा किंवा दात घासून तोंड स्वच्छ करा. 
 • झिंकने समृद्ध असलेल्या वस्तू खाव्या आणि तोंडाला स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी चूळ भरा. 
 • वेळेवर जेवण करावं आणि दातांमधील अडकलेल्या अन्नाला नेहमीच स्वच्छ करावं. 
 • सतत पाणी प्या. माऊथवॉश आणि मुखवास (माउथ फ्रेशनर) वापरणं गरजेचं आहे.
 • जेवणानंतर काही काळ चालणे किंवा पाचक गोष्टींचे सेवन करा
 • तंबाखू आणि सिगारेट या व्यसनांना दूर ठेवा.
 • बडी शोप, वेलची, ज्येष्ठमध, भाजलेलं जिरं, धणे हे सर्व नैसर्गिक मुखवास आहेत. त्यामुळे यांचे सतत सेवन करा. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know about the remedies of smell from mouth