esakal | विचारचक्र थांबण्यासाठी..
sakal

बोलून बातमी शोधा

विचारचक्र थांबण्यासाठी..

विचारचक्र थांबण्यासाठी..

sakal_logo
By
देवयानी एम., योगप्रशिक्षक

मागच्या लेखात आपण विचारचक्र म्हणजे काय आणि विचारचक्र आणि त्यामुळे येणारा स्ट्रेस याविषयी जाणून घेतलं. त्यानंतर आता मनात सुरु असलेलं हे विचारचक्र कशा पद्धतीने थांबवायचं ते जाणून घेऊयात.

आता हे विचारांचं चक्र थांबवायचं कसं? आपल्यातील प्रत्येकाला हा प्रश्न आहेच आणि त्याची नितांत गरजदेखील आहे. विचारांना विचार थांबवू शकत नाहीत. विचारांवर एकच शस्त्र आहे ते म्हणजे शांतता. शांत बसणं इतकं सोपं असतं तर प्रश्नच मिटला असता! या शांततेची प्रॅक्टिस योग सरावात होत असते. नियमित योगसाधना दोन विचारांमध्ये पॉज निर्माण करायला शिकवते. हा पॉज आपल्याला हळूहळू वाढत न्यायचा आहे. जितकी याची प्रॅक्टिस होईल तितकी मनाला सवय लागत जाते आणि हळूहळू मनाची ठेवण बनते. अशी सवय विकसित झाल्यावर एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर माकड उड्या मारतं, तसं मन एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडं धावणार नाही. त्याला थांबायची सवय लागेल. मग बाहेरून उत्तेजन आलं, तरी विचारांचा गदारोळ न होता ‘थांबा, पाहा, पुढे जा’ असे आपोआप व्हायला लागेल. कारण अगोदरच विचारांनी थकलेल्या मनाला या शांत बसण्यानं विश्रांती मिळेल आणि मग ते मन अशी विश्रांती कशी मिळेल यासाठी योगद्वारे प्रयत्न करू लागेल. विचारांना थांबवायचं कसं हे शास्त्र आपल्याला योग शिकवतो, ते समजलं आणि विकसित केलं, की मग तेच विचार कधी थांबवायचे ही कला आपोआप आत्मसात होत जाईल.

हेही वाचा: विचारचक्र आणि स्ट्रेस

loading image