Winter|हिवाळ्यात चिमुकल्यांची अशी घ्या काळजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baby with Mother
Winter|हिवाळ्यात चिमुकल्यांची अशी घ्या काळजी

हिवाळ्यात चिमुकल्यांची अशी घ्या काळजी

सध्या थंडीचा सिझन सुरू झाला आहे. थंडी सुरू झाल्यावर सर्दी, ताप, त्वचा कोरडी पडणे अशा समस्या जवळपास सगळ्यांना निर्माण होतात. हिवाळ्यात लहान मुलांना तर थंडी जास्त जाणवते. त्यामुळे त्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. हवामान बदलले की वातावरणातही चढउतार होतात. त्यामुळे साहजिकच शरीराला समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात मुलांची त्वचा खूप कोरडी होऊन त्वचेवर बारीक पुरळ किंवा फोड येतात. त्यामुळे मुलांना खाज सुटायला लागते. तसेच जास्त कपडे घातल्याने त्यांना गुदमरल्यासारखे वाटते. म्हणून त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

अशी घ्या काळजी

नियमित आंघोळ घाला

मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुले स्वच्छ राहण्यासाठी त्यांना नियमितपणे आंघोळ घालणे आवश्यक आहे. आपण अनेकदा मुलांना गरजेपेक्षा जास्त कपडे घालतो. त्यामुळे घाम येऊन त्वचेची छिद्रे बंद होतात. पण आंघोळ केल्याने ही छिद्रे उघडल्याने मुलांना ताजेतवाने वाटते. पण 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ घालू नये, तसेच कोमट पाण्याचा वापर करता. जर मुलाला आंघोळ घालणे शक्य नसेल तर कोमट पाण्यात टॉवेल पिळून मुलाला पुसता येऊ शकते. यानंतर मॉइश्चरायझिंग क्रीम लावून कपडे घाला.

खोली उबदार ठेवा

रात्री मुलाच्या अंगावर खूप पांघरूणं, रजई घालू नका. त्यापेक्षा तुम्ही खोली उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर हलके पांघरूण घालू शकता.

ओवा फायदेशीर

जर थंडीमुळे मुलांचे पोट दुखत असेल किंवा पोट साफ हो नसेल तर ओव्याचा उपयोग करा. ओवा गरम करून पोटाला शेक द्या. त्यामुळे आराम मिळेल. पण एकदा डॉक्टरांचा सल्लाही घ्या.

baby massage

baby massage

तेलाने मॉलिश करा

हिवाळ्यात बेबी ऑईलने मसाज करणे गरजेचे आहे. मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते. शरीरातील कफ दररोज बाहेर पडतो. पण मसाजसाठी तेल कोमट करून वापरा. यासाठी तुम्ही खोबरेल, मोहरीचे. बदाम तेल किंवा बेबी ऑईल वापरू शकता. गरम तेलाने मॉलिश केल्यामुळे मुलांचे स्नायू मजबूत होतील. तसेच शरीरही उबदार राहील.

ऋतुनुसार आहार द्या

मुलांना ऋतुनुसार फळे आणि भाज्या देता येतील. यामुळे त्यांना हिवाळ्यात रोगाशी लढण्यासाठी ताकद मिळेल. जर मुल मोठं असेल तर रोज बदाम, काजू, मनुका देणे योग्य ठरेल. तुम्ही अंडंही देऊ शकता. अंड्यामुळे शरीर उबदार राहील.

पायात मोजे घाला

मुलांच्या खोलीत एअर प्युरिफायर बसवा. यामुळे ते प्रदूषण आणि धुरापासून सुरक्षित राहतील. तसेच तळव्याला थंड लागू नये म्हणून त्यांच्या पायात मोजे घाला किंवा पायाभोवती कापड गुंडाळा.

उन्हात बसवा

आरोग्य चांगले राखण्यासाठी सूर्यप्रकाश महत्वाचा आहे. मुलाला सकाळी काही वेळ उन्हात बसवा. त्यामुळे त्यांना व्हिटॅमिन डी मिळेल.

loading image
go to top