esakal | मधुमेह आणि तोंडाचे आरोग्य; अशी घ्या काळजी?
sakal

बोलून बातमी शोधा

मधुमेह आणि तोंडाचे आरोग्य; अशी घ्या काळजी?

मधुमेह आणि तोंडाचे आरोग्य; अशी घ्या काळजी?

sakal_logo
By
टीम इ सकाळ

- डॉ. संजय अग्रवाल

वैद्यकीय भाषेमध्ये हायपरग्लायसेमिया म्हणून समोर येणारी मधुमेह ही एक अशी आरोग्यसमस्या आहे, जिचे निदान लवकरात लवकर होणे गरजेचे असते. बहुतेकजण या स्थितीबद्दल अनभिज्ञ असतात आणि कधीतरी सहज केलेल्या तपासणीतून आपल्याला हा आजार असल्याचे त्यांच्या लक्षात येते. आज जगभरामध्ये 463 दशलक्षांहून अधिक लोकांना मधुमेहाचा त्रास आहे व 2030 पर्यंत हा आकडा 578 दशलक्षांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.

तोंडाच्या आरोग्याची काळजी मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते ही गोष्ट आज संशोधनक्षेत्रात लागणाऱ्या नवनव्या शोधांतून आपल्या लक्षात आली आहे. तोंडाच्या आरोग्याचा मधुमेहाशी असलेल्या अन्योन्य संबंधाविषयी विविध क्षेत्रांतील फिजिशियन्समध्ये आता कुठे जागरुकता येऊ लागली आहे.

मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे वेगवेगळी असली तरीही आशियायी लोकांमध्ये साधारणपणे 30-50 या वयोगटामध्ये हा आजार उद्भवतो, अर्थात कोणत्याही वयामध्ये तो जडण्याची शक्यता असतेच. आजच्या काळात या आजारासंबंधीची चिंतेची बाब म्हणजे हा आजार असलेल्या प्रत्येक दोन व्यक्तींमधील एक व्यक्तीचे निदानच होत नाही. सध्या उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांवरून असे दिसून येते की, साखरेवर चांगले नियंत्रण ठेवण्याचाही तोंडाच्या गुंतागुतींच्या समस्या नियंत्रणात ठेवण्याशी परस्पर संबंध आहे. मधुमेह आणि पीरिओडॉन्टायटिस व जिंजिव्हायटिससारख्या बहुविध तोंडांच्या समस्या यांचा मूळ स्त्रोत समानच असल्याने हे एकमेकांच्या अनुषंगाने येणारे आजार आहेत. तोंडाचे आरोग्य आणि मधुमेह यांच्यातील हा दुतर्फी संबंध लक्षात येणे ही खरेतर एक सकारात्मक घटना आहे कारण त्यामुळे दोन्ही गोष्टींची एकत्रितपणे काळजी घेतली जाऊन दोन्ही प्रकारच्या आजारांचा धोका आणि उद्भव कमी होण्यास मदत होऊ शकेल.

दातांच्या दवाखान्यांमध्ये यादृष्टीने अतिरिक्त तपासण्या, स्क्रीनिंग पॉइंट्स ठेवले गेल्यास मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणाची समस्या लक्षात यायला मदत होऊ शकेल. या तपासण्यांतून हाती आलेल्या निष्कर्षांवरून रुग्णाला असलेल्या मधुमेहाचे यशस्वीपणे निदान होऊ शकेल व त्याला आणखी तपशीलवर तपासण्या करून घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकेल. तपासणीची ही प्रक्रिया लक्षणे नसलेल्या व्यक्तींसाठीही काटेकोरपणे राबवली गेली पाहिजे, विशेषत: आजाराचा धोका जास्त असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत तर ती आग्रहाने केली गेली पाहिजे. तोंडाच्या आरोग्याचे व्यवस्थापन फिजिशयन आणि रुग्ण व्यक्ती यांनी आपापसांत चर्चा करून, रुग्णाच्या विशिष्ट गरजानुसार केले पाहिजे व त्यात औषधे आणि औषधांच्या मात्रेतील फेरफार यांसारख्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे, जेणेकरून उपचारांचा जास्तीत-जास्त लाभ मिळू शकेल.

संभाव्य गुंतागुंतींविषयी अधिक सजगता यावी यासाठी किशोरवयीन व प्रौढ व्यक्तींना तोंडाची वार्षिक तपासण करून घेण्याचा सल्ला दिला गेला पाहिजे. तोंडात फोड येणे, प्लाकमुळे तोंड कोरडे पडणे आणि ग्लुकोजच्या पातळीमधील असमतोल यांसारख्या तोंडाच्या आरोग्याशी संबंधित गुंतागुंतीच्या समस्यांचे प्रभावी निरीक्षण केले जाऊ शकते आणि मधुमेहाची तपासणी करून घेत त्यावर उपचारही केले जाऊ शकतात.

हेही वाचा: हृदयविकार आणि कोरोना टाळायचाय? दहा आयुर्वेदिक उपाय करा ट्राय

दिवसातून दोन वेळा ब्रश करण्यासारख्या तोंडाची स्वच्छता जपणा-या सवयी या दाताच्या समस्या टाळण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत तसेच मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी या आजाराचा धोका आणखी वाढू नये यासाठीही या सवयी जपणे महत्त्वाचे आहे. रुग्णांना पीरिओडॉन्टायटिस आणि जिन्जिव्हायटिससारख्या तोंडाच्या दुर्धर आजारांमुळे दातांना आधार देणारा साचा कमकुवत होत जाऊन दात गमवावे लागतात पण त्याचबरोबर हे आजार मधुमेहाच्या रुग्णांमधील गुंतागुंतीही वाढविणारे आहेत याची माहिती रुग्णांना करून दिली जायला हवी. दुस-या बाजूला तोंडाचे आरोग्य जपणारे चांगले उपचार रुग्णांचे ग्लायकेमिक नियंत्रण सुधारण्यातही मदत करू शकेल.

कडक तपासण्या आणि संयुक्त उपचार हे तोंडाचे आरोग्य व चांगले ग्लायकेमिक नियंत्रण साध्य करण्यासाठीचे महत्त्वाचे उपाय आहेत. दात आणि हिरड्या निरोगी असणे, त्यांची चांगली देखभाल ठेवणे य गोष्टी केवळ तोंडाचे आरोग्य जपण्यासाठीच नव्हे तर मधुमेहातील गुंतागुंतीवर नजर ठेवण्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे.

हेही वाचा: मुलांच्या मनावरचा ताण शोधा! 13 प्रश्नांमधूनच मिळू शकते उत्तर

loading image
go to top