कोरोना रुग्णांना Black fungusचा धोका? जाणून घ्या लक्षणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना रुग्णांना Black fungusचा धोका? जाणून घ्या लक्षणे

कोरोना रुग्णांना Black fungusचा धोका? जाणून घ्या लक्षणे

कोरोना विषाणूच्या (corona virus) वाढत्या प्रकोपामुळे देशातील जनता आधीच हवालदिल झाली आहे. त्यातच आता Black fungus या नव्या आजाराने डोकं वर काढलं आहे. कोरोना रुग्णांमध्ये किंवा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये Black fungus हा आजार दिसून येत आहे. याला म्यूकरमायकोसिस (mucormycosis) असंही म्हटलं जातंय. आतापर्यंत अनेक रुग्णांना म्यूकरमायकोसिसचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एक नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्ती आणि अतिदक्षतागृहात असलेल्या कोरोनाग्रस्त व्यक्तींची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, अशा रुग्णांना Black fungus म्हणजेच म्यूकरमायकोसिस (mucormycosis) होण्याची शक्यता अधिक असते. (icmr issues advisory saying black fungus in covid patients can turn fatal if left untreated)

म्यूकरमायकोसिसविषयी (mucormycosis) केंद्रीय आरोग्य मंत्रालय व इंडियन कॉन्सिलिंग ऑफ मेडिकल रिसर्चकडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात म्यूकरमायकोसिसची (mucormycosis) लक्षणे आणि या काळात कोणती काळजी घ्यावी ते सांगण्यात आलं आहे.

Black fungus infections म्हणजे काय?

कोरोनाग्रस्त किंवा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये Black fungus infections ची लक्षणं पाहायला मिळतात. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. त्यांना हा आजार खासकरुन होतो.

Black fungus infections ची लक्षणे कोणती?

डोळे आणि नाक लाल होऊन ते सतत दुखणे, ताप येणे, खोकला होणे, डोकेदुखी,श्वास घेण्यास अडथळा, उलटीतून रक्त पडणे, मानसिक आरोग्यावर परिणाम, दातदुखी अशी लक्षणं साधारणपणे यात जाणवतात.

सर्वात जास्त धोका कोणाला?

ज्या रुग्णांचा मधुमेह अनियंत्रित स्वरुपात आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. अशा रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस होण्याची शक्यता अधिक आहे.

काळजी कशी घ्यावी

मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी. तसंच कोविडवर मात केलेल्या रुग्णांनी blood glucose ची लेव्हल सतत चेक करावी. जर एखादी व्यक्ती स्टेरॉइडचा वापर करत असेल तर त्यांनी वारंवार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ऑक्सिजन थेरपी करतांना क्लीन स्ट्राइल पाण्याचा वापर करावा. Black fungus ची सामान्य लक्षण जरी आढळली तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.