वातावरणातील बदलामुळे 'ताप' वाढला, प्रदूषणाचाही मोठा परिणाम; घरोघरी सर्दी, खोकल्याची समस्या

सध्या होत असल्याचा हवामान बदलामुळे मुंबईकरांचा ‘ताप’ वाढला आहे.
Cough and Cold
Cough and Coldesakal
Summary

शहरातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रदूषण, तापमानातील चढ-उतार यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.

मुंबई : सध्या होत असल्याचा हवामान बदलामुळे मुंबईकरांचा ‘ताप’ वाढला आहे. सध्या दोन दिवसांपासून अचानक वाढत असलेल्या तापमानामुळे दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांनी (Doctor) सांगितले. तसेच वाढत्या प्रदूषणामुळे खोकला आणि सर्दीच्या (Cough and Cold) रुग्णांत वाढ होत आहे.

Cough and Cold
Gallstones Symptoms : पित्ताशयात खडे होण्याचे प्रमाण वाढले; काय आहे कारण? टाळण्यासाठी काय करावे?

शहरातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रदूषण, तापमानातील चढ-उतार यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. सुशिला मिश्रा यांनी सांगितले की, तीन आठवड्यांपूर्वी मला सर्दी-खोकल्याचा त्रास होत होता. मी डॉक्टरांकडून औषध (Medicine) घेतल्यावर काही दिवसांनी बरे वाटले. पण, दोन आठवड्यांनी मला पुन्हा खोकल्याचा त्रास होत असल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सर्दी-खोकला झालेल्या रुग्णांना औषध घेतल्यावर बरे वाटते. मात्र, हवामान बदलामुळे दोन ते तीन आठवड्यांनंतर यातील काही रुग्णांना पुन्हा खोकल्याचा त्रास होत आहे.

बॉम्बे रुग्णालयाचे फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी म्हणाले की, माझ्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांपैकी ३० ते ४० टक्के रुग्ण हे बरे झाल्यानंतर पुन्हा खोकल्याची समस्या घेऊन येत आहेत. रुग्ण पहिल्यांदा श्वसनमार्गाच्या संसर्गाच्या तक्रारी घेऊन येतात. यात घसा खवखवणे, सर्दी आणि खोकला अशा लक्षणांचा समावेश आहे. औषध दिल्यानंतर आठवडाभरात तो रुग्ण बरा होतो, मात्र तिसऱ्या आठवड्यांत पुन्हा तोच रुग्ण येत आहे.

Cough and Cold
Health News : निसर्गानं दाताची निर्मिती केलीये, दात दागिना मानावा का?

सायन रुग्णालयाच्या मेडीसिन विभागाचे प्रमुख डॉ. नितीन कर्णिक यांनी सांगितले की, आमच्याकडे फारसे रुग्ण नाहीत; परंतु काही रुग्ण बरे झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर पुन्हा खोकला आणि कफ यांसारख्या तक्रारी घेऊन येत आहेत. यामुळे रुग्ण वाढले रुग्ण संख्या वाढण्यामागे तीन कारणे असल्याचे सर्व डॉक्टरांनी सांगितले. यात सतत तापमानात होत असलेला बदल, हे या मागील प्रमुख कारण आहे.

कारण कधी थंड, कधी उष्ण वातावरणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. दुसरे म्हणजे, शहरातील प्रदूषणाचा फुफ्‍फुसांवर परिणाम होतो. तिसरे कारण म्हणजे लोकांची कमी प्रतिकारशक्ती आणि आरोग्याबाबतचा निष्काळजीपणा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

तीन आठवडे समस्या

ब्रीच कँडी रुग्णालयाचे इंटरनल मेडीसिनतज्ज्ञ डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले की, दररोज चार ते पाच रुग्ण सर्दी, खोकल्याच्या तक्रारी घेऊन येतात. औषध दिल्यानंतर ते बरे होतात; परंतु खोकल्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तीन आठवड्यांपर्यंतचा कालावधी लागतो.

Cough and Cold
Brain Hemorrhage Symptoms : मेंदूत रक्तस्राव होण्याची कोणती आहेत कारणे? पेशंटवर काय होतो आघात?

ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांपैकी १० ते १५ टक्के रुग्ण बरे झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा सर्दी-खोकल्याच्या तक्रारी घेऊन येतात. त्यांना प्रतिजैविकेही द्यावी लागतात. घसादुखीवर उपाय म्हणून रुग्णांना गुळण्या करण्याचा सल्ला दिला जातो.

-डॉ. मधुकर गायकवाड, औषध विभागप्रमुख, जे. जे. रुग्णालय.

काय करायला हवे?

  • मास्क घालणे फार महत्त्वाचे आहे.

  • धूळ किंवा बांधकामाच्या ठिकाणांपासून दूर राहा.

  • जास्तीत जास्त पाणी प्यावे,

  • थंड पाण्याऐवजी कोमट पाणी प्यावे.

  • डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे घ्यावीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com