Bathroom Time : तुम्हीही बाथरुममध्ये तासन् तास घालवतात का? सर्वेक्षणातून समोर आली ही ४ कारणं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bathroom Time

Bathroom Time : तुम्हीही बाथरुममध्ये तासन् तास घालवतात का? सर्वेक्षणातून समोर आली ही ४ कारणं

Increased Bathroom Time : पूर्वी जेव्हा एकच टॉयलेट-बाथरुम होते तेव्हा सकाळच्या गडबडीच्या वेळात पटापट आवरा म्हणून घराघरात आवाज, गोंधळ ऐकायला मिळायचा. पण हल्ली प्रत्येक खोलीला स्वतंत्र टॉयलेट-बाथरूम असल्याने लोकं स्वतःला हवा तेवढा वेळ तिथं घालवतात असं समोर आलं आहे. पण स्वतंत्र बाथरूम एवढं एकच कारण या मागे आहे का? असा प्रश्न समोर ठेवत एक सर्वेक्षण करण्यात आलं आहे. तर काय सांगतं सर्वेक्षण, जाणून घेऊया.

मिळतो मी टाईम

बाथरूम ही जागा घरातली तुलनेने सगळ्यात लहान जागा असते. पण इथे मी एकट्यानेच असतो. इतर कोणी सोबत नसल्याने ही स्पेस फक्त माझ्यासाठी, माझी अशी आहे. या गडबडीच्या, गोंधळाच्या आणि गर्दीच्या काळात स्वतःसाठी असलेला वेळ, जागा म्हणून इथे फीलिंग असते. म्हणून इथे वेळ घालवण्याचा स्पॅन वाढतो.

हेही वाचा: Female Psycology : महिला पुरुषांचे कपडे का घालतात? हे आहे लॉजिक

क्रिएटीव्हीटी

बऱ्याच लोकांचं ऑबझर्वेशन असतं की, त्यांना सगळ्यात चांगल्या कल्पना, क्रिएटीव्ह गोष्टी या बहुतेकदा बाथरुमध्येच सुचल्या आहेत. इथे इतर कोणत्याही गोष्टी तुमचं लक्ष विचलीत करत नसल्याने नवनवीन कल्पना सुचण्यासाठी ही जागा उत्तम असते. क्रिएटीव्हिटीला स्कोप मिळतो म्हणून बाथरुममध्ये वेळ अधिक घालवला जातो.

हेही वाचा: Time Management Tips : वर्क अन् डेली लाइफ मॅनेज होत नाही? ट्राय करा 'या' टिप्स

स्ट्रेस रिलीजिंग स्पेस

काही लोकांच्या मते या जागी स्ट्रेस रिलीज होतो. इथे आपण एकटे असतो. कोणीही आपल्याला जज करणारे नसते. त्यामुळे तुमच्या भावनांचा आणि शारीरिक घाणीचा एकूणच सर्वच स्ट्रेसचा नीचरा करणारं हे ठिकाण असतं. त्यामुळे इथे रिलॅक्सिंग फीलिंग येतं.

हेही वाचा: Stress Management : कामाच्या ठिकाणी स्ट्रेस येतोय? टेन्शन घालवण्याचं हे आहे सिक्रेट

फोन

स्मार्टफोन आणि त्याद्वारे एका क्लिकवर उपलब्ध झालेले जग यामुळे बाथरुममधला वेळ वाढल्याचं सर्वाधिक प्रमाणात समोर आलं आहे. अनेकांना बाथरुममध्ये फोन घेऊन जाण्याची सवय झाली आहे. बसल्या बसल्या फोनवर सर्फिंग करताना किती वेळ निघून जातो समजतच नाही असं अनेकांचं म्हणणं आहे.

टॅग्स :BathroomTime