Time Management Tips : वर्क अन् डेली लाइफ मॅनेज होत नाही? ट्राय करा 'या' टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Time Management Tips

Time Management Tips : वर्क अन् डेली लाइफ मॅनेज होत नाही? ट्राय करा 'या' टिप्स

कोविड काळापासून वर्क फ्रॉम होम कल्चर फार वेगात वाढले आहे. एकीकडे घरीच राहून काम करण्याचे समाधान आहे तर दुसरीकडे प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफ मॅनेज करणे कठीण होते.

वर्क फ्रॉम होम करणारे घरात तर असतात. पण संपूर्ण दिवस कामातच असतात. अशात मुलांसाठीच्या वेळाचे नियोजन करता येत नसेल तर या टिप्स नक्की वाचा.

शेड्यूल बनवा

वर्क फ्रॉम होम करत असाल तर मुलांसाठी एक शेड्यूल बनवा. शेड्यूल बनवल्याने तुम्हीपण मुलांसाठी वेळ काढू शकाल आणि मुलेपण डेली रूटीनमध्ये प्रॉपर टाइम मॅजमेंट करू शकतात. वर्क फ्रॉम होम ला मॅनेज करण्यासाठी महत्वाच्या गोष्टींमधील एक आहे.

एक किड्स रूम बनवा

खूप वेळ मोबाईल किंवा टीव्ही बघणे मुलांसाठी योग्य नाही. यामुळे त्यांचे डोळे खराब होतील व त्याची त्यांना व्यसन लागू शकेल. अशात या सगळ्यातून मुलांना दूर ठेवण्यासाठी किड्स रूमचा फार फायदा होतो. यात सर्व फन ॲक्टिव्हीटी ठेवाव्या. असे काल्याने मुले चांगला टाइम एन्जॉय करू शकतील. त्यामुळे तुम्ही तुमचे काम वेळेत पूर्ण करून त्यांना वेळ देउ शकाल.

कामाच्या वेळा

जर वर्क फ्रॉम होम करत असाल आणि मुले सारखे मध्ये येत असतील तर कामासाठी असा वेळ निवडा जेंव्हा मुले शाळेत गेलेले असतील किंवा झोपले असतील. असे केल्याने तुम्ही तुमचे काम शांततेत करू शकाल आणि मुलांसोबतपण वेळ घालवू शकाल.

सोबत जेवण करा

वर्क फ्रॉम होम करत असालात तरी लंच ब्रेक घेताना मुलांच्या लंचच्या वेळेत घ्या. म्हणजे एकत्र चांगला वेळ घालवू शकाल.