
सद्गुरू
प्रश्न : आज आपण कोणत्या प्रकारच्या क्रिया करायला हव्यात ज्यामुळे भविष्यात जीवनातील कटुता टाळली जाईल?
सद्गुरू : कोणत्याही अनुभवाची कटुता काय घडले आहे यात नसून ती तुम्ही कशी स्वीकारता यात असते. एका व्यक्तीसाठी जे अतिशय कटू असू शकते, ते दुसऱ्यासाठी आशीर्वाद ठरू शकते. एकदा, दुःखाने भारावून गेलेल्या एका माणसाने एका थडग्यावर लोटांगण घातले आणि धाय मोकलून रडू लागला. ‘‘माझं जीवन! अरे! हे किती निरर्थक आहे! माझा हा देह किती निरुपयोगी आहे कारण तू गेलास. जर तू जिवंत असतास!’’ एका धर्मोपदेशकाने हे ऐकले आणि म्हणाला, ‘‘मला असं वाटतं या मातीच्या ढिगाऱ्याखाली पहुडलेली व्यक्ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची होती.’’ ‘‘महत्त्वाची? हो, खरंच,’’ तो माणूस आणखी जोरात रडत म्हणाला, ‘‘तो माझ्या बायकोचा पहिला नवरा होता!’ कटुता ही काय घडत आहे यात नसून तुम्ही स्वतःला ती कशी अनुभवू आणि स्वीकारू देता यात आहे. भूतकाळातील कोणतीही क्रिया किंवा कर्म हे देखील कृतीच्या संदर्भात नसून ते ज्या हेतूने केले जाते त्या संदर्भात आहे.