
World Diabetes Day : तुमच्या मुलाला डायबिटीज होईल याची भीती वाटतेय, अशी घ्या काळजी
मधुमेह हा गंभीर आजार आहे. सध्या मोठ्या प्रमाणात डायबिटीजचे रूग्ण सापडत आहेत. यात तरूण मुलांचे प्रमाण वाढत आहे. मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुलांतही हा आजार दिसून येत आहे. यामागे अनेक कारणं असू शकतात. एकतर बदलती जीवनशैली, जंकफूड जास्त खाणे, शारिरीक श्रम कमी असणे ही कारणे लहान मुलांचा डायबिटीज वाढण्यामागे आढळून येत आहेत. ज्या मुलांच्या आई-वडिलांना आधीपासून डायबिटीज आहे, त्यांच्या मुलांना हा आजार होण्याचा धोका असतो. भारतात 20 लाखांपेक्षा जास्त मुलांना टाईप 2 चा डायबिटीज आहे.

small kids doing yoga
अशी आहेत लक्षणे- तुमच्या मुलाला सतत भूक लागत असेल किंवा सारखी लघवी होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना सतत थकवा येत असेल तर लगेचच डॉक्टरांना दाखवा,. लहान मुलांच्या मधुमेहाचे निदान लवकर झालेले चांगले अशते. नाहीतर त्यांच्या प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.
योग्य आहार घ्या - आहार वेळोवेळी आणि पोष्टीक घेणे हा मधुमेहापासून वाचण्याचा उत्तम पर्याय आहे. मुलांच्या आहारामध्ये फळं, भाज्या, हिरव्या पालेभाज्या, डाळींचा समावेश करणे योग्य ठरेल.
व्यायामाची सवय- व्यायाम केल्याने मुलांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना व्यायामाची सवय लावणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना काळात मुलं घरीच होती. आता त्याना काळजी घेऊन घराबाहेर पडू द्या. तेथे त्यांना मैदानी खेळ खेळायला द्या.
डॉक्टरांचा सल्ला घ्या- घरात डायबिटीजची परंपरा असेल तर मुलांनाही तो होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणे फायद्याचे ठरेल. तसेच योग्य तपासण्या करून घ्या.