टोमॅटो खाल्याने कमी होऊ शकतो लठ्ठपणा; जाणून घ्या फायदे

tomato.jpg
tomato.jpg

सतत धावणाऱ्या या जगात बऱ्याच जणांना लठ्ठपणाच्या चिंतेने ग्रासलं आहे. यावर एक घरगूती उपाय आहे. आपण आहारात जर टोमॅटोचा सामावेश केला तर लठ्ठपणा कमी  करण्यास मदत होऊ शकते. टोमॅटो खानं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आपण घरी कोशिंबीरी किंवा भाज्या बनवण्यासाठी टोमॅटो वापरतो. टोमॅटो  सेवनाने आपल्या शरीरातील बरेच हानिकारक घटक नष्ट होतात. ज्यामुळे आपण निरोगी राहू शकतो. टोमॅटोमध्ये असे बरेच घटक आढळतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. तसेच यामुळे आपली  पचनसंस्थाही मजबूत होते आणि लठ्ठपणाही कमी होण्यास मदत होते. टोमॅटोचा रसही तुमचे वजन कमी करण्यास मदत करतो.

काय सांगता! सतत गोड खाल्ल्याने मेंदूवर होतो परिणाम? या आहेत वाईट सवयी..

टोमॅटो व्हिटॅमिन सी ( vitamin C) चा  चांगला स्रोत आहे. तसेच त्यात सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सल्फरचे चांगलं प्रमाण असते. टोमॅटोमध्ये असणाऱ्या 'ग्लूटाथिओन'  शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करते. टोमॅटोमध्ये अनेक महत्वाची रसायने असतात जी व्यायामानंतर स्नायूंचा ताण कमी करतात आणि रक्त प्रवाह सुधारण्यासही मदत करतात. टोमॅटो आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.  यात भरपूर व्हिटॅमिन C असल्यामुळे ते त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. यामुळे त्वचेवर येणाऱ्या फोडं कमी होतात.

टोमॅटोमुळे आपला ब्लड प्रेशर ( Blood Pressure) व्यवस्थित राहतो. कारण त्यात भरपूर पोटॅशियम असते, जे आपला रक्तदाब योग्य ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे आपल्याला कोणत्याही रक्तदाबासंबंधित रोगाचा धोका कमी होतो. 

तुम्हाला डायबेटिस आणि डायलिसिस यामधील संबंध माहिती आहे का ?

टोमॅटोमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ए (Vitamin A) च्या प्रमाणामुळे ते आपल्या डोळ्यांना कमकुवत होण्यापासून वाचवते.  डोळ्यांना होणारे आजारही टोमॅटोच्या सेवनाने कमी होण्यास मदत होते. टोमॅटो खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्याही कमी होण्यास मदत होते. टोमॅटो आहारात आणून आपण हा रोग बराच कमी करू शकतो. बद्धकोष्ठतेची समस्या दूर झाल्यास आपली पाचक शक्ती देखील मजबूत होते आणि यकृत संबंधित रोगांचा धोका कमी करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com