अवघ्या काही मिनिटांत त्वचेचं खुलवा सौंदर्य.. हे उपाय एकदा करून बघाच

अथर्व महांकाळ
Thursday, 17 September 2020

आता चिंता करू नका. अवघ्या काही मिनिटात तुमची स्किन सुंदर आणि निरोगी कशी कराल याबद्दल आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. 

नागपूर: आजकाल प्रत्येकाचेच आयुष्य धावपळीचे आणि तणावाचे झाले आहे. त्यात कोरोनासारख्या महामारीमुळे अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. त्यामुळे अनेकांना घरून काम करताना स्वतःच्या त्वचेकडे लक्ष देण्यासाठीही वेळ नाहीये. सध्या तापमानातील बदलांमुळेही अनेकांना त्वचेच्या समस्यांचा सामना करावा  लागत आहे. पण आता चिंता करू नका. अवघ्या काही मिनिटात तुमची स्किन सुंदर आणि निरोगी कशी कराल याबद्दल आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. 

कशामुळे निर्माण होतात त्वचेच्या समस्या 

 • स्कीनचं सौंदर्य खुलवण्यासाठी केवळ ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर केल्यामुळे या समस्या निर्माण होतात.
 • कोरोना काळात घरून काम करत असताना पोषक आहार न घेतल्यामुळे स्किनच्या समस्या निर्माण होतात. 
 • रासायनिक पदार्थ असलेले ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्यामुळेही या समस्या निर्माण होऊ शकतात. 

जिच्या काठावर वसले आहे अख्खे नागपूर त्या 'नाग नदीचा' इतिहास माहिती आहे का? नाही ना. मग जाणून घ्या

असं खुलवा त्वचेचं सौंदर्य 

 • आठवड्यातून तीन वेळा 45 मिनिटं व्यायाम केल्यास आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहील. 
 •  कमीत कमी ८ तास झोप घ्या. झोप पूर्ण झाली नाही तर त्वचेसंबंधी समस्या जाणवू शकतात. 
 • आहारात काकडी, टोमॅटो, कोबी, द्राक्षं आणि टरबूज अशा काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.
 • भरपूर पाणी प्या. ज्यामुळे शरीरात त्वचेची आर्द्रता योग्य राखल्यास त्वचा निरोगी आणि चमकदार राहील.
 • ताणामुळे कॉर्टिसॉल हार्मोन्सची निर्मिती जास्त होते ज्यामुळे त्वचा कोरडी पडते, सुरकुत्या येतात. त्यामुळे तणावापासून दूर राहा. 
 • मीठ, साखर, मध आणि नारळ तेल यांचं मिश्रण तयार करा. हे मिश्रण आठवड्यातून दोनदा त्वचेवर लावून मृत त्वचा काढून टाका.
 • द्राक्षं अर्ध कापून घ्या आणि त्वचेवर चोळा. ज्यामुळे त्वचा स्वच्छ होईल.
 • फेस मास्कचा वापर करा. पपईचा मास्क वापरा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know the home remedies to protect you skin read full story