जाणून घ्या, चांगल्या आरोग्यासाठी सफरचंद कसे खावे? सोलून की, न सोलता

सफरचंदात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात
Apple
Appleesakal

सफरचंदांबद्दल असे मानले जाते की, जे दररोज सफरचंद खातात त्यांना डॉक्टरकडे जाण्याची गरज भासत नाही. पण, वास्तविक सफरचंद हे असे सुपरफूड आहे जे आरोग्यासाठी एक-दोन नव्हे तर अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात. पण, सफरचंद खाताना अनेकदा मनात एक प्रश्न पडतो की, सफरचंद सोलून खावे की, न सोलता खावे? जाणून घेऊया तसेच उत्तर निश्चित करणारी कारणेही जाणून घेऊया.

सफरचंद सालीसकट खावे की, सोलून खावे

रसायनांचा धोका

गेल्या काही दशकांपासून, सफरचंदांची विक्री वाढवण्यासाठी, ते मोठ्या प्रमाणात पॉलिश केले जाते, ज्यामध्ये मेण आणि रासायनिक क्लीनर वापरले जातात. याशिवाय कीटकनाशकाची थेट फवारणीही केली जाते. त्याच वेळी, सर्व सफरचंद व्यवस्थित स्वच्छ न करता, त्यांना साध्या पाण्याने धुतले जाते. अशा परिस्थितीत केमिकलयुक्त सफरचंदाची साल पोटात पोहोचते.

ऍलर्जी होण्याची शक्यता

कीटकनाशक आणि मेणाचा थर असलेले सफरचंद खाल्ल्यास त्वचेची ऍलर्जी होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. तसेच त्वचेला खाज सुटण्याची किंवा इतर समस्या देखील उद्भवू शकते.

Apple
फराळ करताना गोडधोड हवं! जाणून घ्या सफरचंदाची रबडी कशी करायची?

रोग होऊ शकतात

सफरचंदाच्या चांगल्या उत्पादनासाठी रसायने आणि कीटकनाशके उपयुक्त आहेत पण ते तुमच्या आरोग्यासाठीही चांगले आहेतच असे नाही. ही रसायने असलेली साले खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात

सफरचंद कसे खावे

सोललेली सफरचंद खाण्यात अधिक फायदा होतो कारण ते हानिकारक थर काढून टाकते हे उघड आहे. पण, जर तुम्हाला फळाची साल सोबत खायची असेल, तर सफरचंद कोमट पाण्याने धुवा म्हणजे मेणाचा थर धुवून जाईल . तसेच त्यावर काळे डाग किंवा छिद्र दिसले तर सफरचंद पूर्णपणे धुऊन नंतर खराब झालेला भाग कापून काढा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com