रात्री शांत झोप लागत नाही? मग हे उपाय करा आणि घ्या 'चैन की निंद'

अथर्व महांकाळ 
Monday, 21 September 2020

अनेकांना झोप न येण्याची किंवा शांत झोप न लागण्याची समस्या असते. कितीही थकून घरी आले अनेकांना शांतपणे झोप लागत नाही. मात्र आता चिंता करू नका. शांतपणे झोप येण्यासाठी काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर जाणून घेऊया. 

नागपूर : झोप म्हणजे आपल्यापैकी कित्येक जणांचा सर्वात आवडता विषय. जर तुमच्याकडे वेळच वेळ आहे तर तुम्हाला कोणते काम करायला आवडेल असे विचारले तर तब्बल ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचे उत्तर 'झोपणे' हेच असेल यात शंका नाही. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी झोप आवश्यकही आहे. काही लोक अगदी कुंभकर्णासारखे तासंतास झोपतात. मात्र अनेकांना झोप न येण्याची किंवा शांत झोप न लागण्याची समस्या असते. कितीही थकून घरी आले अनेकांना शांतपणे झोप लागत नाही. मात्र आता चिंता करू नका. शांतपणे झोप येण्यासाठी काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर जाणून घेऊया. 

शांत झोप न येण्याची कारणे 

 • वेळेचे चुकीचे नियोजन 
 • कामाचा आणि वयक्तिक आयुष्यातील ताण, तणाव
 • शरीरातील कमजोर पचनशक्ती 
 • दिवसभरातील नकारात्मक गोष्टींचे विचार 
 • आहारातील तेलकट आणि तिखट पदार्थ

हेही वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन

हे उपाय करा आणि घ्या चैन की निंद

 • शांत झोप लागण्यासाठी सर्वात महत्वाचा आणि उत्तम उपाय म्हणजे झोपण्याच्या वेळेचे अचूक नियोजन. आपल्याला साधारणतः किती वाजता झोप येते आणि आपली झोप किती वाजता पूर्ण होते हे ठरवून घ्या. नियमित त्याचवेळी झोपा आणि नियोजनानुसार उठा. तुम्हाला शांत झोप येईल.
 • आपल्या वयक्तिक आयुष्यातील आणि सामाजिक आयुष्यातील गोष्टींचा ताण घेऊ नका. जर तुम्ही तणावात असाल तर तुम्हाला शांत झोप लागणार नाही. म्हणून झोप लागण्यापूर्वी तुमच्या आवडीची गाणी ऐका किंवा आवडीचे पुस्तक वाचा. 
 • शांत झोप लागण्यासाठी रात्री झोपताना कपभर कोमट दुधात एक चमचा मध घालून प्या. ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल. 
 • रोज रात्रीचे जेवण झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास पायी फिरणे फायदेशीर आहे. यामुळे तुमची पचनशक्ती उत्तम राहते आणि तुम्हाला झोप लागण्यास मदत होते. 
 • रात्रीच्या जेवणात तेलकट, आंबट आणि अतितिखट पदार्थांचा समावेश टाळा. रात्री थोडे कमी जेवण करा. म्हणजे जळजळ होणार नाही आणि झोप उत्तम येईल. 
 • रात्री झोपताना डोक्याला हलक्या हातांनी मालिश करा ज्यामुळे तुमच्या शरीरात रक्ताभिसरण उत्तम राहील आणि तुम्हाला शांत झोप लागेल. 
 • झोपताना तुमच्या तळपायाला नारळाचे तेल चोळून घ्या यामुळे तुम्हाला नक्कीच उत्तम झोप लागेल. 
 • झोपताना सैल आणि शरीर संपूर्ण झाकले जाईल असे कपडे घाला. ज्यामुळे तुम्हाला झोपण्यात अडचण येणार नाही आणि डासांपासूनही संरक्षण होईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know remedies to sleep well read full story