
डॉ. ऋतुपर्ण शिंदे - हृदयरोगतज्ज्ञ
आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्यातील बहुतेक लोक पॅकबंद अन्नावर अवलंबून असतात - बिस्किटे, ब्रेकफास्ट सीरिअल्स, स्नॅक्स, पेये, रेडीमेड आटा किंवा तांदूळ. अशी पॅकेट्स आकर्षक रंगात आणि लक्षवेधी घोषवाक्यांसह येतात. उदाहरणार्थ, ‘नो अॅडेड शुगर’, ‘हाय प्रोटिन’, ‘फॅट-फ्री’; पण प्रत्यक्षात ती खरोखर आरोग्यदायी आहेतच असे नाही. यासाठीच फूड लेबल वाचायला शिकणे म्हणजे आरोग्यासाठी नवीन भाषा शिकणे आहे.