थायरॉईडबद्दल जाणून घेऊया

Let's learn about thyroid
Let's learn about thyroid

थायरॉईड एक महत्त्वाची ग्रंथी असून, ही ग्रंथी शरीरातील हार्मोन्सची पातळी नियंत्रित राखण्याचे काम करते. मात्र, या ग्रंथीच्या कमतरतेमुळे किंवा अतिरिक्त प्रमाणामुळे शरीराचं संतुलन बिघडण्याची शक्‍यता असते. अशा या महत्त्वपूर्ण ग्रंथीविषयी जाणून घेऊया. 


कधी कधी आपण आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती पाहतो ज्या एकदम बारीक होत जातात किंवा काही केल्या त्यांचं वजन कमी होत नाही. किंवा काही व्यक्तींच्या गळ्याशी मोठी गाठ आलेली दिसते. अशा या थायरॉईडविषयी जाणून घेऊया. 

वात, कफ आणि मेद जेव्हा दूषित होतं तेव्हा ते सगळं गळ्यात जमा होतं. त्यानंतर त्या ठिकाणी सूज येते. हळूहळू ही सूज वाढत जाते. यालाच आपण "गलगंड' झाले असे म्हणतो. आपल्या शरीरात काही अंत:स्राव करणाऱ्या ग्रंथी असतात. ज्यांचं काम शरीरातील हार्मोन्सचं संतुलन राखणं असतं. या ग्रंथींपैकीच एक ग्रंथी म्हणजे थायरॉईड ग्रंथी होय. ही ग्रंथी गळ्याच्या मधल्या भागात असते. 

कोणत्या कारणाने होतो थायरॉईड? 

  • हा अनुवंशिक आजार आहे. 
  • खाण्यात आयोडिनचं प्रमाण कमी असल्यास 
  • अति टेंशन असल्यास 
  • खाण्याच्या चुकीच्या पद्धती 
  • अतिरिक्त जागरण करणे 
  • मूड डिसऑर्डरची मात्र दीर्घकाळ घेतल्याने हार्मोन्सची मात्र कमी होत जाते त्यामुळे थायरॉईडच्या ग्रंथीचं संतुलन बिघडतं. 

थायरॉईडचे प्रकार कोणते ? 

  • थायरॉईडचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. 
  • एक म्हणजे हाईपोथायराईडिज्म आणि दुसरा म्हणजे हायपरथायराईडिज्म. 

थायरॉईडची लक्षणे  

  • भूक कमी लागणे, पण वजनात वाढ होत जाणे 
  • हृदयाचे ठोके कमी होणे 
  • गळ्याच्या आसपासच्या भागात सूज येणे 
  • आळस वाटणे 
  • अशक्तपणा जाणवणे 
  • डिप्रेशनमनध्ये जाणे 
  • घाम कमी येणे 
  • त्वचा कोरडी होणे 
  • अधिक थंडी लागणे अधिक म्हणजे उन्हाळ्यातही थंडी लागणे 
  • केसांच्या गळतीत वाढ होणे 
  • स्मरणशक्ती कमी होणे 
  • काही लोकांची ऐकण्याची क्षमता कमी होते 

काय करावं ? 

  • नियमित व्यायाम करावा 
  • हा आजार गळ्याशी निगडित असल्याने खाकरणे किंवा गळ्यात कंपन निर्माण करणारी आसनं तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी. 
  • शांत आणि स्वस्थ राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा. ताणतणाव, चिंता यापासून स्वत:ला दूर ठेवा. 
  • जीवनशैली व्यवस्थित ठेवा 
  • रागावर नियंत्रण ठेवा 

 नियंत्रणासाठीचे उपाय 


हा आजार औषधांनी नियंत्रित केला जाऊ शकतो. पण, कधी कधी काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियाही करावी लागते. आजाराच्या प्रकारावर किंवा गांभीर्यावर या आजाराची उपचारपद्धती अवलंबून असते. हाईपोथायराईडिज्म हा प्रकार औषधांनी नियंत्रित आणता येतो. 
उदाहरणार्थ हृदयाचे कमी झालेले ठोके औषधांनी नियंत्रित करता येतात. मात्र जेव्हा हायपरथायराईडिज्म होतो त्यात थायरॉईड ग्रंथींचं वाढलेलं प्रमाण कमी करणं आवश्‍यक असतं. किंवा त्या ग्रंथीतून अतिरिक्त स्राव बाहेर पडू नये म्हणून काळजी घेणं आवश्‍यक असतं. म्हणूनच हायपरथायराईडिज्ममध्ये औषधांनी काहीही नियंत्रित होत नाही. या प्रकारात गळ्याची सूज वाढून गलगंड होण्याची शक्‍यता अधिक असते. 
हा गलगंड वाढत गेल्यास परिणामी ऑपरेशनशिवाय कोणताही पर्याय नसतो. कारण पुढे जाऊन थायरॉईड कर्करोग होण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. म्हणूनच तो गलगंड काढून टाकण्यासाठी ऑपरेशन करणं आवश्‍यक असतं. मात्र, बहुतांश वेळा थायरॉईड ग्रंथीचा आजार नियंत्रित राखण्यास औषधांचा उपयोग होतो. त्यामुळे घाबरण्यासारखं काहीही नाही. म्हणूनच आपण आपल्या डॉक्‍टरांना वेळोवेळी आपल्याला काय होतंय, याची कल्पना देणं आवश्‍यक आहे. 

काय खाऊ नये ? 

  • मिरची किंवा मसालेदार खाणं कमी करावं. 
  • वांगं, भात, दही, राजमा यांचा आहारात वापर करू नये 
  • तेलकट पदार्थ समोसे, वडे यांचं सेवन करू नये 
  • अतिगरम किंवा अति थंड असा कोणताही पदार्थ सेवन करू नये  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com