ब्रेस्ट कॅन्सर आनुवंशिक आहे का?  कर्करोगाविषयी स्त्रियांमधील समज-गैरसमज

Breast cancer
Breast cancer
Updated on

बदलत्या जीवनशैली आणि आहारपद्धतीमुळे अनेकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. अनेक जण गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. यात सध्या पाहायला गेलं तर कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असे अनेक आजार नागरिकांमध्ये बळावत आहेत. त्यातच गेल्या काही काळापासून कर्करोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे स्त्रियांमधील स्तनाच्या कर्करोगाची झपाट्याने वाढ होत असून याविषयी स्त्रियांमध्ये अनेक गैरसमजदेखील आहेत. अनेकदा संकोच, भिती, अज्ञान व अशिक्षितपणा यामुळे स्तन कर्करोगाबाबतचे गैरसमज निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं. यामुळे भारतीय महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत न होता उशीरा होते. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने आजार बळावतो. म्हणूनच स्तनाच्या कर्करोगाबाबत असलेले गैरसमज दूर होणं गरजेचं आहे. 

१. महिलेला कर्करोग होण्यामागे आनुवंशिक घटक कारणीभूत ठरतात का?

कुटुंबातील एखाद्या स्त्रीला जर स्तनाचा कर्करोग असेल तर तो अन्य काही महिलांमध्येदेखील होण्याची शक्यता असते. मात्र, हे प्रमाण अगदी ५ टक्के इतकंच आहे. तसंच काही वेळा स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचा कोणताही कौटुंबिक इतिहास नसताना सुद्धा कर्करोग झालेला आहे.

२. केवळ वृद्ध महिलांनाच स्तनाचा कर्करोग होतो का?

स्तनाचा कर्करोग केवळ वृद्ध स्त्रियांनाच होतो हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. खरं तर रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय सध्या तरुण मुलींनादेखील स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. सध्या, स्तनाचा कर्करोग सामान्यत: ५० वर्षांखालील तरुण स्त्रियांमध्ये दिसून येतो. म्हणूनच, प्रत्येक वयोगटातील महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

३. स्तनात वेदना होणे म्हणजे स्तनाचा कर्करोग?

- अनेकदा छातीती किंवा स्तनामध्ये दुखू लागल्यावर स्त्रिया घाबरतात आणि हेच स्तनाच्या कर्करोगाचं लक्षण असल्याचं मानतात. मात्र, प्रत्यक्षात तसं मुळीच नाही. मासिक पाळी संपल्यानंतर ही वेदना नाहीशी होऊ शकते. स्तनातून स्त्राव निघत असल्यास स्तनाचा संसर्ग देखील होऊ शकतो. परंतु, अनेक महिला स्तनाच्या वेदनेकडे दुर्लक्ष करतात. वेळीच निदान व उपचार न मिळाल्यास आजार बळावू शकतो. म्हणूनच महिलांनी स्तनात वेदना जाणवत असल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

४. डीओडोरंट्स आणि अंडर-वायर ब्राच्या वापरामुळे स्तन कर्करोगास आमंत्रित मिळते?

- समाजात पसरलेला हा सर्वात मोठा गैरसमज आहे. डीओडोरंट्स आणि अंडर-वायर ब्रा च्या वापरामुळे स्तन कर्करोग होत नाही. डीओडोरंट्समध्ये असलेले हानिकारक रसायने स्तनामध्ये असलेल्या पेशींमध्ये पसरतात ज्यामुळे कर्करोग होतो. किंवा, अंडर-वायर ब्रामुळे स्तनाचा कर्करोग होतो, असा एक समज आहे. मात्र, तो पूर्णपणे चुकीचा आहे.

५. मॅमोग्राफी अतिशय वेदनादायक आणि असुरक्षित आहेत?

- हे मुळीच खरे नाही. मॅमोग्राफी वेदनाविरहीत आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. चाळीशीतील प्रत्येक महिलांनी स्तनाचा कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे, यासाठी मेमोग्राफी तपासणी करून घेणं गरजेचं आहे. परंतु, हे लक्षात ठेवा की मेमोग्रॉफीमुळे स्तनाचा कर्करोग होतो हा गैरसमज आहे. तसं काहीही होत नाही. त्यामुळे स्तनाची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेमोग्रॉफी करून घ्यावी.

( लेखक डॉ. धैर्याशील सावंत हे एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट / एसीआय कुंबाला हिल रूग्णालय येथे संयुक्त वैद्यकीय संचालक आहेत.)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com