esakal | तंबाखूच्या व्यसनाला करा लॉकडाउन; फॉलो करा डॉक्टरांच्या टीप्स
sakal

बोलून बातमी शोधा

तंबाखूच्या व्यसनाला करा लॉकडाउन; फॉलो करा डॉक्टरांच्या टीप्स

तंबाखूच्या व्यसनाला करा लॉकडाउन; फॉलो करा डॉक्टरांच्या टीप्स

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्याच्या काळात अनेक तरुण व्यसनांच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळतं. मद्यपान, धुम्रपान अशी अनेक व्यसन तरुण करत असून यात तंबाखूचं (tobacco) सेवन करणाऱ्यांचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे या व्यसनामुळे पुढे अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात, याची जाणीव असूनही तरुण या व्यसनाकडे वळत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात १० कोटीपेक्षा अधिक नागरिक विविध माध्यमातून तंबाखुचे सेवन करतात. यामध्ये २५ टक्के पुरुष तर, १३ ते १५ टक्के महिलांचा समावेश आहे. यापैकी १० लाख रुग्णांना तंबाखूजन्य (tobacco) पदार्थाच्या सेवनाने प्राण गमवावे लागतात. इतकंच नाही तर, अनेक जणांना हदयासंबंधी विकार, स्ट्रोक आणि कर्करोगाचा सामना करावा लागत आहे. (made-aware-about-the-ill-effects-of-tobacco)

तंबाखूच्या सेवनामुळे –हदयविकाराच्या झटक्याचा तसेच हार्ट स्ट्रोकचा धोका दुप्पटीने वाढतो. तर, धुम्रपान न करणा-यांच्या तुलनेत फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका हा २५ टक्क्यांनी अधिक वाढतो. तंबाखूमुळेच तोंड, जीभ, घसा, अन्ननलिका, आतडी व इतरही अवयवांचे कर्करोग होतात. त्याशिवाय हृदयावर होणारा तंबाखूचा परिणामही तितकाच घातक आहे. तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांमुळे शहरातील वेगवेगळ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळेच हृदयरोग, हृदयरोगाचा झटका, पक्षाघात होऊ शकतो. हाता-पायांच्या रक्तवाहिन्याही ब्लॉक होऊन निरनिराळ्या समस्या उद्भवतात. तंबाखूजन्य पदार्थांमुळेच रक्तदाब वाढतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल) वाढते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) घटते. म्हणूनच, तंबाखूचे व्यसन सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील हे ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. धीरज खडकबाण यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: स्कूल बसचा रंग ‘पिवळा’ च का?

तंबाखूमधील अल्कोहोलाईड रसायनात कोटीनाईन, अ‍ॅन्टबीन, अ‍ॅनाबेसीन अशी रसायने असून भारतीय तंबाखूमध्ये मक्र्युरी, लेड, क्रोमियम, कॅडमियम आदी अतिविषारी रसायने सापडतात. या व्यतिरिक्त तंबाखूच्या धुरात व धुम्रपानात डीडीटी, बुटेन, सायनाईड, अमोनिया आदी रसायने आढळतात. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होतो. तंबाखूच्या सेवनाने त्यातील निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्य थांबते. मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते. तसेच जे लोक धूम्रपान करतात त्यांना हृदयघात होण्याची शक्यता अधिक असते

तंबाखू सोडण्यासाठी करा 'हे' उपाय

१. सर्वात प्रथम तंबाखू का सोडायची आहे यामागचं कारण जाणून घ्या. तंबाखूमुळे कर्करोग,हदयविकार, फुफ्फुसाचा आजार यांना निमंत्रण मिळू शकतं. त्यामुळे तंबाखू सोडावी हा मूळ उद्देश.

२. तंबाखु सोडण्याची तारीख ठरवा.

३. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीचा आधार घ्या.

४. समुपदेशनाचा आधार घ्या.

५. कुटुंब, मित्रपरिवाराची मदत घ्या. त्यांचा सल्ला ऐका. त्यांच्यासोबत चांगला वेळ व्यतीत करा.

६. ताणतणाव टाळा, अल्कोहोलचे सेवन टाळा, तलफ लागल्यास दुसरीकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करा.

७. व्यसन सोडतांना आठवड्यातून १ वेळ व्यसन केलं तर चालेल हा गैरसमज दूर करा व्यसन सोडत असतांना एकही दिवस व्यसनाकडे वळू नका.

८. ध्यानधारणा, योगसाधना करा.

९. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा.

१०. व्यसन करण्याची इच्छा झाल्यास लवंग, बडीशोप असे घरातील पदार्थ चघळा.

loading image