असा टिकवून ठेवा ट्रेकिंगसाठीचा फिटनेस!

Fitness
Fitness

ट्रेकिंगची आवड अनेकांना असते. हिवाळा आणि पावसाळ्यातही ट्रेकिंग मोठ्या प्रमाणावर केले जाते. तर उन्हाळ्यात जास्त उंचीचे ट्रेक केल्याने तब्येत बिघडण्याची शक्‍यता असते. उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात ट्रेकऐवजी जंगल भटकंती, किल्ले यांवर भ्रमंती केली जाते; मात्र पुढे ट्रेकिंगमध्ये तोच उत्साह कायम ठेवण्यासाठी रोज व्यायाम गरजेचा असतो. सध्या लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे शक्‍य नाही. तरीही ट्रेकिंगमधील फिटनेस तुम्ही घरच्या घरी टिकवून ठेवू शकता.

हा व्यायाम करा...

  • भ्रमंती करायची नाही म्हणून उशिरापर्यंत झोपू नका. 
  • लवकर उठून तातडीने व्यायामास सुरवातही करू नका. 
  • प्रारंभी स्नायूंना बळकटी आणण्यासाठी स्ट्रेचिंगचे व्यायाम करा.
  • स्ट्रेचिंगमध्ये पायाच्या नखापासून ते मानेपर्यंतच्या सांध्याचे व्यायाम करा. त्यातून गुडघे, पंजा, चवडे, खांदा, बोटांची ताकद वाढेल. २० मिनिटांपर्यंत हे व्यायाम करावेत.
  • ट्रेकींग करणाऱ्यांना फुफ्फुसे व ह्रदयाची ताकद टिकवून ठेवावी लागते. त्यासाठी श्‍वसनाचे व्यायाम दहा मिनिटे करावेत. दीर्घ श्‍वसन फायदेशीर ठरते.
  • या व्यायामानंतर किमान चार पायऱ्या चढणे, उतरणे असा व्यायाम करा. हा व्यायाम पाच-पाच मिनिटांच्या अंतराने दहा मिनिटे करावा. जेणेकरून पिंढऱ्यांचे स्नायू बळकट होतील. 
  • पायऱ्या चढ उतार केल्याने पायाकडून ह्रदयाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढून ह्रदयावर ताण येऊन ह्रदय सक्षम होण्यास मदत होईल. 

फिरण्याची सवय असणाऱ्यांनी मानसिकता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांगसुंदर सूर्यनमस्कार दहा मिनिटे घालावेत. त्यातून फुफ्फुसाचा व्यायाम होईल आणि आत्मविश्‍वासही उंचावेल.
सर्वात शेवटी शरीर शिथील करण्यासाठी दहा मिनिटे संथ चालण्याचा व्यायाम करावा. त्यानंतर पाच मिनिटे ध्यान करावे. उन्हे वाढण्यापूर्वी हे सर्व व्यायाम करावेत. शक्‍यतो दुपारची झोप टाळून वाचनावर भर द्या.

आहारात ही घ्या काळजी...

  • शरिरामध्ये पाण्याचे संतुलन राहण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी प्या. 
  • रसदार फळे खा. तसेच सकाळी पिष्टमय पदार्थ, रात्री हलका आहार घ्या आणि फळे खा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com