हसण्यासाठी जगा : हेतू असेल उदात्त, प्रसन्न होईल चित्त!

लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण दिवसभर काहींना काही काम करत असतो. वयानुसार, क्षमतेनुसार, अनुभवानुसार, गरजेनुसार कामाचं स्वरूप बदलत जातं.
Laughting
LaughtingSakal

लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण दिवसभर काहींना काही काम करत असतो. वयानुसार, क्षमतेनुसार, अनुभवानुसार, गरजेनुसार कामाचं स्वरूप बदलत जातं. लोकांच्या बोलण्यातून त्यांची कामाबद्दलची भावना व्यक्त होत असते.  नैराश्यवादी लोकांना ‘सध्या काय चाललंय,’ असं विचारल्यानंतर...

ऑफिसमध्ये काम करणारी एखादी व्यक्ती म्हणते, ‘‘काय चालणार. आठ तास पाट्या टाकायच्या दुसरं काय?’’

एखादा कॉलेज मधला विद्यार्थी म्हणतो, ‘‘फक्त लॉग-इन  टाकायचं. व्हिडिओ ऑफ असल्यामुळं सरांना काही कळत नाही काय करतोय ते!’’

एखादा ज्येष्ठ नागरिक म्हणतो, ‘‘आलेला दिवस ढकलतोय. बाकी काही नाही,’’

तुम्ही करत असलेल्या कामाबद्दलची तुमच्या मनात असणारी प्रेरणा, हेतू हे तुमच्या यशाची दिशा ठरवतं. तसंच मानसिक समाधानही ठरवतं. सकारात्मक लोकं कामाकडं वेगळ्या नजरेनं बघतात.

  • नव्या मंदिराच्या उभारणीच्या ठिकाणी, छिन्नी  हातोडा घेऊन काम करणाऱ्या माणसाला विचारलं, ‘तू काय करतोयस?’ एक जण म्हणाला, ‘मी  दगड फोडतोय’,  तर दुसरा म्हणाला, ‘मी दगडात लपलेली मूर्ती, बाहेर काढतोय!’

  • एका कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून गेलो असताना, तिथल्या प्राचार्यांना मी विचारलं, ‘इथं विद्यार्थ्यांना कोणकोणते कोर्सेस शिकवता?’ प्राचार्य  स्मित हास्य करत म्हणाले, ‘आम्ही  फक्त शिकवत नाही. तर नवीन पिढी तयार करतो.’

  • एका  सैन्यदलातील जवानाला विचारलं, ‘तुम्ही कुठे नोकरी करता?’  तो जवान अभिमानाने म्हणाला, ‘मी नोकरी करत नाही, तर देशसेवा करतो.’

  • मुलाखतीमध्ये प्रसिद्ध गायिकेला विचारलं, ‘तुम्ही किती वर्ष गात आहात?’ त्यावर  त्या नम्रपणे म्हणाल्या, ‘मी अजूनही गाणं शिकते आहे. संगीताची साधना करते आहे.’

  • प्रसिद्ध हास्यकलाकाराला विचारलं, ‘हजारो लोकांना हसवण्याचं काम आपण करत आहात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?’ तो कलाकार म्हणाला, ‘कला सादरीकरण हे माझ्यासाठी काम नाही. तर लोकांना दोन क्षण  हसवून त्यांना तणावमुक्त करण्याची परमेश्वरानं दिलेली ही संधी आहे.’

  • सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणारे तरुण दर रविवारी श्रमदान करत झाडं लावत असतात. त्यांना विचारलं, ‘तुम्ही झाडं लावण्याचं काम का करता?’  

ते म्हणाले, ‘कोरोनामध्ये लोकं  ऑक्सिजनचे सिलिंडर मिळवण्यासाठी पळत होते. आम्ही इथं फक्त झाडं नाही, तर  अनेक पिढ्यांसाठी ऑक्सिजन निर्माण करणारे कारखाने लावत  आहोत!’

आपल्या कामाबद्दल नकारात्मकतेची भावना ठेवण्याऐवजी त्यामुळं समाजात कोणता सकारात्मक बदल होऊ शकतो याचा विचार करणं महत्त्वाचं आहे.  तुमच्या कामामुळं समाजात कोणता सकारात्मक बदल होऊ शकतो, याचा विचार करा. प्रत्येक कार्याचं कारण असतं आणि परिणामही असतो. तुमच्या कामामधील ‘उदात्त हेतू अर्थात नोबल कॉझ’ स्वतःलाच लक्षात आला, तर तो जगण्याला प्रेरणा देतो. यामुळं काम करण्यात उत्साह येतो.

‘मला काहीतरी हवं आहे,’ या अपेक्षेपेक्षा, ‘मला काही तरी द्यायचं आहे,’ ही भावना मनात सकारात्मकता निर्माण करते. तुम्ही करत असलेल्या कामाकडं या नव्या नजरेनं पाहा. म्हणजे त्या कामाला आणि जगण्याला नवा अर्थ प्राप्त होईल.

‘कर्मा’चं ‘मर्म’ समजलं तर ‘जगण्याचा धर्म’ सकारात्मक होतो! कामाचा ‘हेतू उदात्त’ असेल तर ‘प्रसन्न चित्त’ नक्की होईल!!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com