गुडघेदुखीपासून मुक्तता!

मौशुमी नगरकर
बुधवार, 22 जानेवारी 2020

गुडघेदुखीने त्रस्त असलेल्यांसाठी मी काही प्राथमिक व्यायामप्रकार सुचविणार आहे, ते तुम्ही दररोज करू शकता.

तर हा लेख अगदी तुमच्यासाठीच आहे.
तुम्ही वरीलपैकी कोणत्याही वर्गात मोडत असल्यास काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. धावणे, चालणे, बसून प्रवास करणे यासाठी घोट्याबरोबर गुडघा हाही महत्त्वाचा अवयव आहे. तो शरीरातील सर्वांत मजबूत अवयव आहे. सध्या अनेकांना गुडघेदुखीने सतावल्याचे दिसून येते. त्याला काही ठळक कारणे आहेत. त्यामध्ये दुखापत, अर्थ्रिटिस, वाजवीपेक्षा अधिक वजन किंवा व्यायामापूर्वी बळकटीकरण न करणे यांचा समावेश आहे. मॅरेथॉनमध्ये धावणारे असे अनेक धावपटू मला माहीत आहेत, की ते धावण्यापूर्वी गुडघ्यावर पडणाऱ्या वजनाची योग्य प्रमाणात काळजी घेत नाहीत. अनेक जण योग्य पद्धतीने बूट न वापरता कडक पृष्ठभागावर धावण्याचा सराव करतात. काही व्यक्तींच्या कंबरेभोवती अतिरिक्त चरबी जमा होते व त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुडघेदुखीने त्रस्त असलेल्यांसाठी मी काही प्राथमिक व्यायामप्रकार सुचविणार आहे, ते तुम्ही दररोज करू शकता.

  तुम्ही उभे राहिल्यावर किंवा वाकल्यावर गुडघे दुखतात?
  तुम्ही मॅरेथॉन धावक किंवा गिर्यारोहक आहात का?
  तुम्हाला दररोज खूप अंतर चालावं लागतं का?
  थोडक्यात, तुम्ही कायम धावपळ करण्याच्या स्थितीत असता का?

गुडघ्यांवर दाब देणे : तळहात किंवा टॉवेल गुडघ्याच्या खाली ठेवा. मनात दहापर्यंत आकडे मोजत गुडघा तीन वेळा हळुवारपणे दाबा. 

पाय सरळ करणे : पाठीवर झोपून पाय वर- खाली करा. या वेळी गुडघा सरळ ठेवा.

बसून व्यायाम : उंच खुर्चीवर बसा आणि पाय हळुवार पद्धतीने गुडघ्यापासून वर- खाली करा.

उशीचा व्यायाम : खुर्चीवर मांडीखाली उशी घेऊन बसा आणि मांडीवर दाब द्या. हळुवारपणे मनात १६पर्यंत आकडे मोजत दाब कमी करा. 

पायाचा व्यायाम : खुर्चीच्या आधाराने उभे राहा आणि दोन्ही पाय एकाआड एक १६ आकडे मनात मोजत हळुवारपणे हलवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maushami Nagarkar article knee pain