मानसिक आरोग्यासाठी का गरजेचं आहे समुपदेशन? जाणून घ्या कारणं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Counseling
मानसिक आरोग्यासाठी का गरजेचं आहे समुपदेशन? जाणून घ्या कारणं

मानसिक आरोग्यासाठी का गरजेचं आहे समुपदेशन? जाणून घ्या कारणं

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आपल्या मनाच्या भावनिक, वर्तणूक आणि आकलन या पैलूंवर मानसिक आरोग्य समुपदेशन लक्ष केंद्रीत करते. समुपदेशन ही एक प्रक्रिया आहे. यात समुपदेशक योग्य मार्गदर्शन करतात. समुपदेशक क्लायंटला आयता पर्याय देत नाहीत. तर, त्याच्या समस्येचे मूळ शोधून काढण्यात मदत करतो. त्यामुळे क्लायंटसाठी योग्य निर्णय घेणे सोपे होते. समुपदेशक टॉक थेरपीसह विविध प्रकारच्या थेरपींचा वापर करतात. त्यामुळे ते क्लायंटला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. तसेच क्लायंटला स्वतःलाही चांगल्या प्रकारे समजून घेता येते. क्लायंटच्या गरजांनुसार विविध सत्रांचे आयोजन केले जाते.

We Are In This Together या वेबसाईटवर मानसिक आरोग्यविषयक समुपदेशनाविषयी माहिती मिळेल.

ही समुपदेश सत्र वैयक्तिक आणि गटानुसार असु शकतात. व्यावसायिक दृष्टीकोन ठेवत ती ऑनलाईनही घेतली जाऊ शकतात.

हेही वाचा: विवाह समुपदेशन का करायचं? जाणून घ्या कारणं

तुम्हाला मानसिक आरोग्यासाठी समुपदेशकाची गरज का आहे?

आपले म्हणणे काय आहे ते फक्त ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी कोणतरी असावे असे बरेचदा आपल्याला वाटते. तुमच्या कुटुंबातील लोक किंवा मित्र यासाठी मदत करू शकतात. पण एखाद्या वेगळ्या व्यक्तीचा दृष्टीकोन बाजू समजून घेण्यासाठी महत्वाचा वाटू शकतो. समुपदेशक पक्षपात न करता तुम्हाला मदत करण्यास तयार असतो. समुपदेशक हा मित्र किंवा गुरू नसतो. पण उपचाराच्या प्रवासात तो कायम तुमच्यासोबत असतो. तुम्ही खालील कारणासाठी मानसिक आरोग्य सल्लागाराची भेट घेऊ शकता.

1) तुमच्यासाठी त्रासदायक असलेल्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी समुपदेशक ही सुरक्षित जागा आहे.

2) समुपदेशक गोपनियता पाळतात. म्हणजेच ते तुमची ओळख कोणासमोरही उघड करत नाहीत.

3) तुम्ही जे सांगणार आहात ते ऐकायला ते कायम तयार असतात. तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात.

4) ते तुम्हाला दिलासा देतात आणि स्वतच्या विचारांवर ठाम राहण्यास शिकवतात.

5) तुमच्या आयुष्यातील विशिष्ट गोष्टी समजून घेण्यासाठी ते तुम्हाला अंतर्दृष्टी देतात.

6) ते तुम्हाला कोणताही आयता सल्ला देत नाहीत. परंतु तुमच्या समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन करतात. तसेच तुम्हालाच उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहन देतात.

7) स्वतला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ते तुम्हाला मदत करतात.

तुम्हालाही जर समुपदेशन करुन घ्यायचे असेल तर We Are In This Together या वेबसाईटला भेट द्यावी.

loading image
go to top